कोरेगाव भीमा प्रकरण : गडलिंग यांच्या कारागृहातील चौकशीला परवानगी; साक्ष नोंदवण्यासही ईडीला मुंबई सत्र न्यायालयाकडून मान्यता

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमामध्ये हिंसाचाराचा प्रकार घडला. त्यानंतर एल्गार परिषदेतील सहभागामुळे आरोपी शिक्षणतज्ज्ञ सुधीर ढवले, रोना विल्सन, महेश राऊत,शोभा सेन अटक करण्यात आली. त्यामध्ये अँड. सुरेंद्र गडलिंग हे एक असून २०१८ पासून न्यायालयीन कोठडीत तळोजा कारागृहात आहेत.

    मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार (Koregaon Bhima Case) तसेच एल्गार परिषद प्रकरणी (Elgar Conference Case) अटकेत असलेले नागपूरचे वकिल सुरेंद्र गडलिंग यांची कारागृहात जाऊन चौकशी आणि साक्ष नोंदवण्याची अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली (Mumbai Sessions Court on Wednesday allowed the Enforcement Directorate (ED) to go to the jail and interrogate Nagpur lawyer Surendra Gadling and record his testimony). त्यामुळे आता ईडी पुढील आठवड्यात गडलिंग यांची चौकशी करणार आहे.

    पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमामध्ये हिंसाचाराचा प्रकार घडला. त्यानंतर एल्गार परिषदेतील सहभागामुळे आरोपी शिक्षणतज्ज्ञ सुधीर ढवले, रोना विल्सन, महेश राऊत,शोभा सेन अटक करण्यात आली. त्यामध्ये अँड. सुरेंद्र गडलिंग हे एक असून २०१८ पासून न्यायालयीन कोठडीत तळोजा कारागृहात आहेत.

    पीएमएलए कायद्यांतर्गत ईडीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी अधिकच्या चौकशीबाबत गडलिंग यांची साक्ष नोंदवण्याची परवानगी मिळवण्यासाठी ईडीने विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्या. राजेश कटारिया यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

    गडलिंग हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असून चौकशी करणे गरजेचे आहे. ते बंदी घालण्यात आलेल्या माओवादी गटाचे सदस्य होते. पैसे जमा करून अन्य सदस्यांना वितरित करणे आदी काम त्यांच्याकडे असल्याचा दाट संशय तपास यंत्रणांना असल्याचा दावा ईडीच्यावतीने करण्यात आला. ईडीच्या युक्तिवादाला गडलिंग यांनी विरोध केला.

    आपल्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आले असून ईडीचे आरोप तथ्य आणि अर्थहीन असल्याचे गडलिंग यांनी युक्तिवाद करताना सांगितले. मात्र, न्यायालयाने ईडीची बाजू ग्राह्य धरत तळोजा कारागृहात असलेल्या गडलिंग यांची १७ ते १९ ऑगस्ट दरम्यान चौकशी करण्याची ईडीला परवानगी दिली.