कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराबाबत निवेदन देताना रमेश उबाळे
कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराबाबत निवेदन देताना रमेश उबाळे

कोरेगाव या सातारा जिल्ह्यातील श्रीमंत नगरपंचायत अशी ओळख झालेल्या नगरपंचायतीमध्ये सध्या विकास कामाच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे कुराण बनले आहे या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. नागरिकांच्या कराच्या रूपाने मिळत असलेल्या निधीचा अशा पद्धतीने वापर होत असल्याने या गोष्टीकडे आता सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेली आहे.

  कोरेगाव : कोरेगाव या सातारा जिल्ह्यातील श्रीमंत नगरपंचायत अशी ओळख झालेल्या नगरपंचायतीमध्ये सध्या विकास कामाच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे कुराण बनले आहे या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. नागरिकांच्या कराच्या रूपाने मिळत असलेल्या निधीचा अशा पद्धतीने वापर होत असल्याने या गोष्टीकडे आता सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेली आहे.

  याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील बाजार पेठ असलेल्या कोरेगाव नगरपंचायतीमार्फत घनकचरा संकलन व प्रक्रिया यावर झालेल्या ३ कोटी ३३, लाख ८९, हजार ५६८ रुपयाचा भ्रष्टाचार कोरेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्यासोबत काही अधिकाऱ्यांनी केलेले आहे. याचे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे. यासाठी नव वर्षाच्या दि: १५ जानेवारी २०२४ रोजी कोरेगाव नगरपंचायत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन व योग्यरीत्या न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने दि:२६ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा निर्णय श्री रमेश उबाळे यांनी घेतलेला आहे. कोरेगाव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांनी करोडो रुपयेचा प्रकल्प कागदावर दाखवून शासनाची व कोरेगावातील नागरिकांची फसवणूक केली आहे. वास्तविक या प्रकल्पाचे उद्घाघाटन नावाला झाले होते.

  प्रकल्प सद्यस्थितीला चालू नाही. तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या गाड्या स्क्रॅपमध्ये टाकून नवीन गाड्या घेण्याचा घाट घातला गेला आहे.
  यामध्ये टक्केवारी उद्योग करण्यात आला आहे. यांची खातेनिहाय चौकशी करून यांना तात्काळ निलंबित करावे.

  प्रकल्प चालू झाल्यापासून सण २०१८ ते २०२३ पर्यंत ३१,२०० उत्पन्न नगरपंचायतीला झालेले आहे. घनकचरा टाकण्याचे ठिकाण देखील बदलले आहे. मग हा प्रकल्प फक्त शासनाची व कोरेगाव नागरिकांची फसवणूक करण्यासाठी केला होता का ? करोडो रुपये खर्च करून संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. १४वा वित्त आयोगाच्या खर्चाबाबतही चौकशी करा . कारण, सदरचा खर्च दि २/२/२०२२पूर्वी असणाऱ्या अखर्चित निधीमधून केला आहे. तसेच या तारखेनंतर चौदावा वित्त आयोग मार्फत निधी प्राप्त झालेला होता. कागदावरील प्रोजेक्ट असल्या कारणाने १४ वित्त आयोगाचे ही पैसे यानंतर खर्च केलेले आहेत. अखर्चित निधी, पैसे खर्च करण्याचा घाट घालून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. कोरेगाव भाजी मंडई मध्ये झालेला माती विक्री यासंदर्भात पत्राद्वारे कळवले आहे.

  कोरेगाव नगरपंचायतीमध्ये नगरपंचायत परिसर प्रकाशमान करण्यासाठी बोगस इन्व्हर्टर व बॅटरी खरेदी करून ५,२४,४६५ रुपयाचा घोटाळा केला आहे . या सर्व भ्रष्टाचाराला मूक संमती असून आर्थिक लाभासाठीच कोरेगाव नगरपंचायती मध्ये आर्थिक घोटाळे होत आहे हे आम्ही निदर्शनास आणून देत असून याबाबत ठोस कारवाई व्हावी अन्यथा लोकशाही मार्गानेच जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रवृत्त करत आहेत असे समजून आम्ही आत्मदहन करत आहे या आत्मदहनाला संबंधित अधिकारी व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असेही श्री रमेश अनिल उबाळे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, नगर विकास सचिव व लाचलुचपत प्रतिबंधक आयुक्त यांना माहितीसाठी सादर करण्यात आलेली आहे त्यांनी सांगितले.