पुणे पोलिसांच्या डिक्सनरीतून ‘कोयता गायब’, इमेज राखण्यासाठी पोलिसांचा असाही प्रयत्न; गुन्ह्यात आता कोयत्या ऐवजी लोखंडी हत्यार शब्दप्रयोग

पुणे पोलिसांच्या (Pune Police) डिक्सनरीतून “कोयता” गायब झाला असून, मौखुख आदेशानंतर पोलिसांनी गुन्ह्यात थेट शब्द बदल करत कोयत्या ऐवजी लोखंडी हत्यार असे लिहण्यास सुरूवात केली आहे. कोयत्यामुळे खालवलेली इमेज राखण्यासाठी पोलिसांनी नवी क्लुप्तीच शोधून काढल्याने पोलीस दलात चर्चेला उधान उटले आहे.

    पुणे : पुणे पोलिसांच्या (Pune Police) डिक्सनरीतून “कोयता” गायब झाला असून, मौखुख आदेशानंतर पोलिसांनी गुन्ह्यात थेट शब्द बदल करत कोयत्या ऐवजी लोखंडी हत्यार असे लिहण्यास सुरूवात केली आहे. कोयत्यामुळे खालवलेली इमेज राखण्यासाठी पोलिसांनी नवी क्लुप्तीच शोधून काढल्याने पोलीस दलात चर्चेला उधान उटले आहे. पण, अनेकांनी यावर प्रतिक्रिया न देता गुपचूप राहण्याचे पसंत केले आहे. स्थानिक पोलीस मात्र, यातून सुटले असून, त्यांनाही या शब्दप्रयोगामुळे हायसे वाटत आहे.

    शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयतेधारी टोळीने दहशत माजवली होती. याविरोधात व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातील कोयता गँगबाबत प्रश्न विचारला होता. त्यानंतर पुण्यातील कोयता गँग राज्यभरात गाजली आणि त्यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाले. परंतु, पुण्यात अशी कोणती एक कोयता गँग अस्थित्वात नाही, हेही तितकेच खरे. पण, असे असले तरी पुण्यातील प्रत्येक म्हणजे, मिसरूडे न फुटलेल्या अन् गल्ली बोळातील पोराढोरांसोबत सराईत गुन्हेगारांच्या हातात कोयता हा हमखास असतो, हेही तितकेच खरे. शहरात होणाऱ्या लुटमारीच्या घटनांमध्ये देखील कोयत्याचाच वापर सरास होताना दिसत आहे.

    शहरात स्ट्रीट क्राईमचा आलेख वाढतानाच कोयत्याने मात्र, पुणे पोलिसांच्या कारभारावरच प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसात तर या कोयत्याने चांगलाच धुमाकूळ घातला. पोलिसांनी कोयते विक्रेत्यांपासून ते कोयते बाळगणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली. तसेच, गुन्हेगारांची झाडाझडतीही नित्याने सुरू केली. सराईतांची यादीच तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यासोबतच कोयते विक्रेत्यांना देखील नियम लावून कोयते घेणाऱ्यांचे आधार कार्ड अन् माहिती जमा करण्याचे आदेश सोडले होते. इतकेच काय तर गुन्हेगार पकडा अन् बक्षिस मिळवा इतपर्यंत पोलिसांनी उपाययोजना राबविल्या.

    पुणे पोलीस इतक्या सर्व उपाययोजना करत असताना देखील कोयत्याचा नाद कमी होत नसल्याचे जानवल्यानंतर आता पोलिसांनी त्यावर जालीम उपाय शोधल्याची चर्चा आख्या शहरात अन् पोलीस दलात खमंगरितीने सुरू आहे. पोलिसांच्या डिक्सनरीतून “कोयता” शब्दच गायब झाला असून, त्या ठिकाणी आता गुन्हा घडल्यानंतर लोखंडी हत्यार असा शब्द लिहीला जात आहे. त्यामुळे कोयताचा प्रभावच कमी झाल्याचे जानवत आहे. मात्र, यामुळे अनेक अडचणी पोलिसांनाच सामोरे जावे लागेल, असेही काही जणांचे मत आहे.

    गुन्ह्याचे गांर्भियच कमी…

    कोणताही गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्यात कोणत्या गोष्टींचा वापर केला, इथपासून सुरूवात होते. कोयता, तलवार, चाकू, काठी, दगड किंवा तत्सम गोष्टी त्यात न्यायालयात सांगितल्या जातात. कोयत्याने वार केले गेले. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा जीव जाऊ शकला असता, असेही त्यातून सिद्ध होते. पण, लोखंडी हत्यार असा शब्द प्रयोग केल्यानंतर हे सिद्ध करताना पोलिसांना बऱ्याच अडचणी समोर येणार आहेत. त्यामुळे एखाद्या गुन्ह्याचे गांर्भियच पोलीस घालवून बसणार आहेत. पोलिसांनी केलेल्या या शब्दप्रयोगाचे परिणाम गुन्ह्यावर न झाल्यास हा पोलिसांचा आटापिटा सफल झाला असे म्हणता येईल.

    स्थानिक पोलीस खुश..!

    शहरात एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयत्याने वार झाल्याची घटना घडल्यानंतर संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना गुन्ह्यांपेक्षा वरिष्ठांचे प्रश्न व होणारी विचारणा, याचेच जास्त टेन्शन येत होते. गेल्या काही दिवसांपासून शहरात हे चित्र पाहिला मिळत होते. पण, आता कोयता शब्द गाळून त्याठिकाणी लोखंडी हत्यार आल्याने स्थानिक पोलिस देखील हायसे झाले आहेत.