दूधगंगेत ‘केपी’च किंग! विरोधकांचा सुपडासाफ

 सत्तारूढ गटाचे वर्चस्व कायम

  कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्यां लक्ष लागून राहिलेल्या बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्या्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यां्या नेतृत्वाखालील श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीनं सर्व्या सर्व २५ जागांवर मताधिक्यानं विजय मिळवला. खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, ए. वाय. पाटील, समरजीत घाटगे यां्या नेतृत्वाखालील विरोधी परिवर्तन आघाडीा या निवडणूकीत पूर्णत: सुपडासाफ झाला.
  कोल्हापुरातील सुवर्ण भूमी हॉल १२० टेबलांवर मतमोजणी झाली. सुरवातीला केंद्रनिहाय पॅनेल टू पॅनेल मतदान झालेल्या पन्नास पन्नास मतपत्रिकांे गठ्ठे बनवण्यात आले. यानंतर सुरवातीला काही केंद्रांवर सत्ताधारी महालक्ष्मी आघाडीे तर काही केंद्रावर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीे उमेदवार आघाडीवर असल्याे दिसून आले. पहिल्या फेरीत मोजलेल्या मतांमध्ये वाघापूर, मुधाळ, गंगापूर आदी गावांत महालक्ष्मी आघाडीं विमान आघाडीवर राहिलं. त्यामुळं सत्ताधारी आघाडीनं विजया्या दिशेनं कू केली.मतमोजणीत आघाडी घेतल्यानंतर सत्तारूढ गटा्या समर्थकांनी गुलालाी उधळण करत प्रंड जल्लोष केला. गावोगावी रात्री उशिरापर्यंत फटाक्यांी आतषबाजी सुरु होती.

  सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीे नेतृत्व पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे, भाजपे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी केलं. तर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीं नेतृत्व खासदार महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, राष्ट्रवादीे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, समरजीत घाटगे, जनता दलाे विठ्ठलराव खोराटे आणि भाजपे नाथाजी पाटील यांनी केलं. दरम्यान, रात्री आठ वाजता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

  सत्ताधाऱ्यांना कागलमध्ये आघाडी
  परिवर्तन आघाडी्या नेत्यांना राधानगरी तालुक्यातून मोठी आघाडी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु सत्तारुढ गटानं इथं लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्यानं परिवर्तनला अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही. तर सत्ताधारी महालक्ष्मी आघाडीनं अपेक्षेनुसार कागल तालुक्यात आघाडी घेतली.

  आव्हान तगडं, तरीही पिछाडी
  या निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडी्या विरोधात परिवर्तन आघाडीनं तगडं आव्हान उभं केलं होतं. एकूण निवडणूक प्रारात परिवर्तननं जोरदार हवा निर्माण केली होती. मात्र, हे वातावरण त्यांना शेवटपर्यंत ठेवता आलं नाही. सुरुवातीा काही काळ सोडला तर विरोधी आघाडी्या एकाही उमेदवाराला आघाडी घेता आली नाही.