“कुलकर्णींचा मतदारसंघ गेला…, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?”; कसबापेठेत लागले भाजपविरोधी बॅनर्स, मजकूरात म्हटलंय…

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच याबाबत उघडपणे बॅनरच्या माध्यमातून नाराजी समोर आली आहे.

    पुणे: कसबा व चिंचवड (Kasba and Chinchwad) या ठिकाणी पोटनिवडणूक (Election) होत आहे. यामुळं येथे भाजपासह मविआने देखील जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. चिंचवडमध्ये भाजपाने (BJP) ही परंपरा पाळली. मात्र, कसबापेठेत ही परंपरा पाळली नाही. त्यामुळं या ठिकाणी भाजपाच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच याबाबत उघडपणे बॅनरच्या माध्यमातून नाराजी समोर आली आहे.

    मतदारसंघ गेला…. टिळकांचा गेला…. आता नंबर बापटांचा का?

    दरम्यान, कसब्यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यानंतर भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाले आहे. “कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला…. टिळकांचा गेला…. आता नंबर बापटांचा का?” असा मजकूर लिहिलेले बॅनर्स कसबापेठेत सध्या झळकत आहे. तसेच हे बॅनर लक्ष्यवेधी ठरत आहेत.

    टिळक समर्थकांची नाराजी…

    पुण्यात कसबा मतदारसंघात अनोखे बॅनर लागले आहेत. पोटनिवडणुकीवरून भाजपला चिमटे घेणारे बॅनर्स कसब्यात लागले आहेत. तसेच भाजपाविरोधी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. समाज कुठवर सहन करणार? असा सवालही या बॅनरवर करण्यात आला आहे. यातून ब्राह्मण समाज भाजपवर प्रचंड नाराज असल्याचा स्पष्ट इशाराच या बॅनर्सवरून देण्यात आला आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या आणि टिळक समर्थकांच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार असल्याची चर्चाही सुरू आहे. तसेच याचा फटका मतातून दिसेल, असं बोललं जात आहे.