कुमठ्यात आरोग्य विभागाच्या दक्षतेमुळे डेंग्यू रुग्ण संख्येत घट

कुमठे ता. कोरेगाव येथे डेंग्यूचे रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गावात दि. १२ ऑक्टोबर पासून सातत्याने रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभागाने तात्काळ वैद्यकीय पथक नेमून घरोघरी भेटी देऊन कंटेनर सर्वेक्षण केला.

    कोरेगाव : कुमठे ता. कोरेगाव येथे डेंग्यूचे रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गावात दि. १२ ऑक्टोबर पासून सातत्याने रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभागाने तात्काळ वैद्यकीय पथक नेमून घरोघरी भेटी देऊन कंटेनर सर्वेक्षण केला. डेंगूसदृश्य साथ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराव्या लागणारी दक्षता घेतल्याने डेंगू रुग्णसंख्येत घट झाली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर असिफ जमादार यांनी सांगितले.

    कुमठे गावात गेले काही दिवसापासून डेंगूसदृश्य साथ फैलवल्याचे दिसून येते. रुग्णसंखेत सातत्याने वाढ होत आहे. आत्ता पर्यन्त ४० पेक्षा अधिक नागरिकांनी कोरेगावातील खाजगी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असल्याचे दिसून येते. पावसाने ओढ दिल्याने बागायत पिके धोक्यात आलेली आहेत. शेतात उभी असणारी पिकं जगवायची कशी ही विवंचना ग्रामस्थांना भेडसावत असतानाच डेंगूच्या वाढत्या संसर्गामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    प्राथमिक आरोग्य केंद्र तडवळे अंतर्गत उपकेंद्र मौजे येथे दिनांक ७ ऑक्टोबर पासून NSI संशयित डेंगू रुग्ण आढळून आल्याचे असल्याचे आले. कुमठे गावात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर असिफ जमादार यांनीं येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तीन पथक नेमून जलद ताप संरक्षण केले. यावेळी १८२ घरांचा कंटेनर सर्वेक्षण केला त्यामध्ये १४ डास अळी असणारी १४ पॉझिटिव्ह घरं मिळाली. इतरही चाचण्या घेण्यात आल्या होत्या. मात्र कोरडा दिवस पाळणे, डबकी मुजविणे, अधिक खबरदारीचे उपायोजना वेळीच न केल्यामुळे पुन्हा डेंगू सदृश्य आजाराची साथ फाईल फैलावल्याचे दिसून आले.

    बुधवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर असिफ जमादार यांनी स्वतः कुमठे गावास भेट देऊन ४ सर्वेक्षण पथकाद्वारे घरोघरी भेट देऊन कंटेनर सर्वेक्षण, ताप रुग्ण शोध मोहीम राबविली. गावात जनजागृती करून आरोग्य विषयक शिक्षण व उपचार जनजागृती आरोग्य शिक्षण पाहणी केली. आत्ता पर्यंत एकूण ३५ रुग्ण NSI संशयित डेंगू रुग्ण आढळले असून त्यातील ३२ रुग्ण पूर्ण बरे झाले असून तीन रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी कुमठे ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकाऱ्यांची घेतली. यावेळी साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी धूर फवारणी करावी व करावी लागणारी दक्षता संदर्भात सूचना आरोग्य विभागाला सूचना केल्या.