राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, मंत्रिमंडळाचे संपूर्ण निर्णय वाचा एक क्लिकवर…

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी योजना' राज्य सरकारने आणत आज महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    मुंबई – आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, राज्यातील मुलींसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राज्य सरकारने आणत आज महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (lake ladki yojana for empowerment of girls in the state important decision of the state government)

    राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय…

    * राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, मुलींना करणार लखपती.
    ( महिला व बालविकास)

    * सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण, मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.
    ( जलसंपदा विभाग)

    * सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये
    (विधि व न्याय विभाग)

    * पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
    (महसूल विभाग)

    * फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
    ( परिवहन विभाग)

    * भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन
    ( महसूल व वन विभाग)

    * विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता
    ( उच्च व तंत्र शिक्षण)