पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, सोसायट्यांचा पाणी पुरवठा बंद

सुमारे दीड तास या पाईपलाईन मधून पाणी वाहत होते. यामुळे येथील रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तळ्याचे रूप प्राप्त झाले होते. तर पाईपलाईन दुरुस्ती होईपर्यंत या लाईन मधील सोसायट्यांचा पाणी पुरवठा बंद राहील असे एमआयडीसीकडून सांगण्यात आले.

    कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील संदेश सोसायटी, महावितरण कार्यालयाजवळ रस्त्यांचे काम चालू असताना सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाण्याची पाइपलाइन फुटली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी याबाबत एमआयडीसीला कळविले असून एमआयडीसी कडून या पाइपलाइन वरील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. सुमारे दीड तास या पाईपलाईन मधून पाणी वाहत होते. यामुळे येथील रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तळ्याचे रूप प्राप्त झाले होते. तर पाईपलाईन दुरुस्ती होईपर्यंत या लाईन मधील सोसायट्यांचा पाणी पुरवठा बंद राहील असे एमआयडीसीकडून सांगण्यात आले.