शिस्तबद्ध भक्तीभाव! लालबागच्या राजासाठी रेल्वेने केली ‘ही’ मोठी घोषणा; क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमचाही वाचेल त्रास

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने मुंबईतल्या सर्वच रेल्वेस्थानकांवर मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये उद्घोषणा (Announcements) सुरू केल्या आहेत.

    मुंबई : नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबाग मार्केट, मुंबई (Lalbaug Market, Mumbai) येथील लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) ख्याती सर्वदूर पसरली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. मोठमोठ्या सेलिब्रिटीनांही या गणपतीच्या दर्शनाचा मोह आवरत नाही. कोरोना काळात (Corona Pandemic) दोन वर्ष असलेली बंदी यंदा उठविल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.

    या ठिकाणी होणारी वाढती गर्दी (Crowd) हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. भाविकांनी गेल्या दोन वर्षांचा दर्शनाचा बॅकलॉग भरून काढण्याचा चंगच बांधला आहे. या निमित्ताने मुंबईच्या सेवा सुविधांवरही (Services And Facilities) त्याचा परिणाम होतो आहे. या ठिकाणी होणारी गर्दी पाहता रेल्वेने (Railway) यावर उतारा म्हणून नामी शक्कल (Idea) लढवली आहे. रेल्वेने दर्शनासाठी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी मोठी घोषणा (Announcement) केली आहे.

    लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने मुंबईतल्या सर्वच रेल्वेस्थानकांवर मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये उद्घोषणा (Announcements) सुरू केल्या आहेत. ज्या भाविकांना नवस फेडायचा आहे (pay off the vows) अशा भाविकांनी करिरोड स्थानकात (Curry Road Railway Station) उतरायचे आहे आणि तेथून यायचे आहे तर ज्या भाविकांना नुसतंच दर्शन घ्यायचं आहे अशा भाविकांनी भायखळा स्थानकात (Byculla Railway Station) उतरून दर्शनासाठी पोहोचायचे आहे.

    रेल्वेने आपल्या सेवेवर येणारा ताण कमी करण्यासाठी ही शक्कल लढवली असली तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी आल्यानंतर गर्दीला कसा आवर घालायचा हाच मोठा पेच असल्याने रेल्वेची ही मात्रा कितपत लागू पडते हे येत्या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.