
Lalit Patil Case : ड्रग माफिया ललित पाटीलला १५ दिवस ससून रुग्णालयात ठेवून घेण्यासाठी दिलेले कारागृह अधीक्षकांचे पत्र आता समोर आले आहे. यामुळे ड्रग माफिया ललित पाटीलला मदत करण्यात येरवडा कारागृह प्रशासनसुद्धा सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. येरवडा कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय आधिकाऱ्याचे पत्र आता समोर आले आहे. ३ जून २०२३ ला लिहलेले हे पत्र आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना उद्देशून हे पत्र लिहण्यात आले आहे.
ललितला ससूनमध्ये १५ दिवस ठेवले
या पत्रात येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधीक्षक ललित पाटीलला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करून घेण्याची आणि किमान १५ दिवस त्याला तिथेच ठेवण्याची विनंती केली आहे. ललित पाटीलला ससूनमधून कारागृहात नेण्यासाठी एस्कॉर्ट उपलब्ध नाही. त्यामुळे ललितला ससूनमध्ये १५ दिवस ठेवले जावे, असे या पत्रात नमूद केलेले आहे.
कारागृहातील अधिकारीसुद्धा त्याच्या ललितच्या पाठीशी
दरम्यान, या पत्रावरती मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे ललित पाटीलला फक्त ससूनमधील डॉक्टर, पुणे पोलिस यांचीच नाही, तर कारागृहातील अधिकारीसुद्धा त्याच्या पाठीशी होते, असे या पत्रातून दिसून येत आहे. या पत्रामुळे येरवडा कारागृह संशयांच्या भोवऱ्यात अडकले आहे.
ललित पाटीलला ससूनमधून कारागृहात नेण्यासाठी एस्कॉर्ट उपलब्ध नाही त्यामुळे ललितला ससूनमध्ये १५ दिवस ठेवलं जावं असं या पत्रात नमूद केलेलं आहे. यानंतर तब्बल ४ महिने ललित पाटील ससूनमध्ये होता. त्यानंतर तो पसार झाला होता.
काही डॉक्टरांना निलंबित करण्यात आले
दरम्यान आता ससून रूग्णालयाचे प्रशासन यांच्यासोबतच काही पोलिसांनी देखील ललित पाटीलला मदत करत असल्याचे समोर आले होते, त्यानंतर आता हे पत्र समोर आले आहे. या प्रकरणी काही डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे, पोलिसांवर कारवाई होत आहे, यासंबधी चौकशी सुरू आहे. आता हे पत्र समोर आल्यानंतर येरवडा कारागृहाचा देखील काही हात आहे का हे पाहण्यासाठी एक चौकशी समिती गठीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.