मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळेजवळ दरड कोसळल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून दरड हटवण्याचे काम सुरु आहे. एमएमआरडीएच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम झाल्यानंतर खोदलेल्या टेकडीला कोणतीही संरक्षक भिंत तयार न केल्याने ही दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळेजवळ दरड कोसळल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून दरड हटवण्याचे काम सुरु आहे. एमएमआरडीएच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम झाल्यानंतर खोदलेल्या टेकडीला कोणतीही संरक्षक भिंत तयार न केल्याने ही दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

    पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसापासून तुफान पाऊस सुरू आहे. यामुळे आज पहाटे येथे काही नागरिकांची घरे कोसळली. अनेकांच्या घरासह घरातील सामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालघर प्रमाणेच वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली आहे. या दरडीखाली ६ जण अडकले होते. त्यापैकी ४
    जणांची सुटका करण्यात आली असून दोघेजण अजूनही दरडीखालीच दबलेले असल्याची माहिती मिळत आहे. वालीव पोलीस आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान दुर्घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १२ आणि १४ जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.