पंढरपूर शहरात भेसळयुक्त पदार्थांचे मोठ्या प्रमाणात विक्री ; नवीन पेठेतील हॉटेलमध्ये उघड्यावर जोमाने विक्री सुरू

अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष ; भेसळीची मिठाई पोटात गेली तर?

    पंढरपूर : पंढरपूर  शहरात नवरात्र महोत्सवामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भेसळयुक्त पदार्थांची विक्री केली जात असल्याचे उघड दिसत असून ही अन्न आणि औषधी प्रशासनान याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते आहे.
    धाडी टाकून भेसळयुक्त पदार्थ नष्टदेखील केले जात नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे ; पण अजूनही आपण खात असलेल्या पदार्थांमध्ये भेसळयुक्त तर नाही ना? अशी शंका प्रत्येक पंढरपूरकरांच्या मनात येत आहे. अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ ही समस्या संपूर्ण महाराष्ट्रात उग्र स्वरूपाची आहे. नवरात्र महोत्सव मध्ये दूध, लाडू , मिठाई, भगर, पेंढा, आदींचा उपयोग उपवासासाठी आणि घरी खाण्यासाठी केला जातो. मागणी जास्त असल्यामुळे अनेक विक्रेते यामध्ये भेसळ करून पदार्थांची विक्री करतात. भेसळ करणाऱ्यांना आपण सामान्य ग्राहकांच्या जिवाशी खेळत असतो हे ठावूक असूनही पैशांच्या मोहापोटी ते भेसळ करीत असतात.
    शहरातील भागात गुटखा विक्रीस बंदी आहे. तरीही काही ठिकाणी याची सर्रास विक्री केली जाते.शहरात नवीन पेठेतील कृष्णाच्या हौदासमोरील हॉटेल मध्ये उघड्यावर जोमाने विक्री सुरू असल्याचे दिसून येते आहे ठिकाणी पेंढा, लाडू , भगर, खाद्यतेल, मिल्क पावडर, दूध आणि खवा या अन्नपदार्थात भेसळ करून विक्री करताना आढळून आले आहेत. भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
    भेसळ करणाऱ्यांना आता तीन वर्षांचा कारावास
    अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कारवाई केली जाते. अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त न्यायनिर्णय अधिकारी म्हणून कार्य करतात. त्यांना १० लाखांपर्यंत दंडाचा अधिकार आहे. तसेच जास्तीत जास्त तीन वर्षांचा कारावास होऊ शकतो.अशा हॉटेल चालकावरती अन्न व औषध प्रशासन कारवाई करणार का? हॉटेल चालकांना अन्न व औषध प्रशासन पाठीशी घालणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होतो.