पुण्यात तोयबाचा समर्थक अटकेत; ATS ची कारवाई

पुणे एटीएसकडून उत्तरप्रदेश येथून इनामुल हक या तरुणास अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या महितीनुसार, इनामुल हक मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी असून तो जुनेद लष्कर-ए -तोयबाच्या संपर्कात होता. आता जुनैद तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाला पुणे एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे(Lashkar-e-Toiba supporter arrested in Pune).

    पुणे : पुणे एटीएसकडून उत्तरप्रदेश येथून इनामुल हक या तरुणास अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या महितीनुसार, इनामुल हक मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी असून तो जुनेद लष्कर-ए -तोयबाच्या संपर्कात होता. आता जुनैद तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाला पुणे एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे(Lashkar-e-Toiba supporter arrested in Pune).

    याप्रकरणी आधीही दोन आरोपींना एटीएसने अटक केली आहे. उत्तर प्रदेश येथील सहारनपूर येथे पुणे एटीएसने कारवाई करत इनामुलला ताब्यात घेतले आहे.

    काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलढाण्यातील जुनैद मोहम्मद या तरुणाला पुणे एटीएसने यापूर्वीही अटक केली होती. काही तासांपूर्वी पुणे ग्रामीणमधून 11 तरूण बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती.