मराठा योद्ध्यावर शासकीय इतमामात अत्यसंस्कार, लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप

आज बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी तसेच मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. अंत्ययात्रेला सुरुवात झाली तेव्हा कार्यकर्ते व नागरिक साश्रुनयनांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देत, टाळ - मृदंगाचा गजर व विनायक मेटे यांचा जयघोष करत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. उत्तमनगर येथे मेटे यांच्यावर  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Marath reservation) लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे रविवारी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पहाटे अपघाती निधन झाले. (Accident in Mumbai pune highway) त्यानंतर अवघ्या वयाच्या ५२ वर्षी हा मराठा योद्धा काळाच्या पडद्याआड गेल्यानं सर्वांनी हळहळ व्यक केली. त्यानंतर मेटे यांचे पार्थिवा बीड (Beed) येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी रात्री उशिरा आणले.

    दरम्यान, त्यानंतर आज बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी तसेच मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. अंत्ययात्रेला सुरुवात झाली तेव्हा कार्यकर्ते व नागरिक साश्रुनयनांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देत, टाळ – मृदंगाचा गजर व विनायक मेटे यांचा जयघोष करत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. उत्तमनगर येथे मेटे यांच्यावर  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी सलामी देत, बंदूकीतील गोळांच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. दरम्यान, अंत्यसंस्कारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, प्रितम मुंडे, गिरिश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, अर्जुन खोतकर, महिला आमदार भारती लव्हेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी भारती लव्हेकर, अर्जुन खोतकर, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विनायक मेटे यांच्या पत्नी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो जनसमुदाय उपस्थित होता, या सर्वांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.