चार महिन्यात वित्तीय तूट १०० अब्ज डॉलरवर पोहोचली, हे केंद्र सरकारचे अपयश, राष्ट्रवादीची मोदी सरकारवर टिका

महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला (Economy) केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. दरम्यान, मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आयात - निर्यातमधील वित्तीय तूट या चार महिन्यात १०० अब्ज डॉलर (dollar) झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी मोदी सरकारवर केला आहे.

    मुंबई : मागील ४५ वर्षातील बेरोजगारीने (Inflation, unemployment) उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीसी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. (Petrol, Diesel, LPC Gas, CNG, PNG rate hike) महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप (Milk, Curd, Paneer, Flour, Oil and Ghee) यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी (GST) लावला आहे. मोदी सरकारने जीएसटीतून (Modi government GST) शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे.

    केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला (Economy) केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. दरम्यान, मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आयात – निर्यातमधील वित्तीय तूट या चार महिन्यात १०० अब्ज डॉलर (dollar) झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी मोदी सरकारवर केला आहे.

    दरम्यान, एकीकडे वाढती महागाई, बेरोजगारी (Inflation, unemployment) आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घटणारे मूल्य या सर्वांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाही ना अशाप्रकारची भीती नागरीक आणि तज्ज्ञांना वाटू लागली आहे. सध्याची परिस्थिती अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही त्यामुळे आपली परकीय गंगाजळी कमी होईल. सध्याच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी विरोधी पक्षातील अनुभवी लोकांना बोलावून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मार्गदर्शन घ्यावे व सकारात्मक मार्ग काढून मात करावी अशी विनंतीही महेश तपासे यांनी केली आहे.