खेराडेवांगीचे जवान लक्ष्मण सूर्यवंशी यांचे कच्छमध्ये निधन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

खेराडे वांगी (ता.‌कडेगाव) येथील बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान लक्ष्मण पांडुरंग सुर्यवंशी (वय ३०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सुर्यवंशी हे गुजरातमधील कच्छ भूजमध्ये बीएसएफमध्ये कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराचा तीव्र झटका झाला. त्यामध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाले. 

  कडेगांव : खेराडे वांगी (ता.‌कडेगाव) येथील बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान लक्ष्मण पांडुरंग सुर्यवंशी (वय ३०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सुर्यवंशी हे गुजरातमधील कच्छ भूजमध्ये बीएसएफमध्ये कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराचा तीव्र झटका झाला. त्यामध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

  सुर्यवंशी यांच्या निधनाची बातमी समजताच खेराडेवांगीसह परिसरात शोककळा पसरली. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांच्या सन्मानार्थ बुंदकीतून‌ हवेत फैरी झाडून‌ मानवंदना दिली.

  लक्ष्मण सुर्यवंशी हे भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. शनिवारी कर्तव्यावर असताना त्यांनी ह्रदयविकाराने निधन झाले.‌ रविवारी सकाळी त्यांच्या जन्मगावी खेराडे वांगी येथे पोहोचल्यानंतर पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात फुलांनी सजवलेल्या वाहनातून‌ अत्यंयात्रा काढण्यात आली. सैन्य दलाच्या जवानांनी बंदुकीच्या हवेत फैरी झाडल्या. त्यांना मानवंदना दिल्या.

  प्रातांधिकारी गणेश मरकड, पोलिस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्यासह ग्रामस्थांनी पुष्पचक्र अर्पण केले.

  डॉ. विश्वजीत कदम यांनी केले सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

  लक्ष्मण सुर्यवंशी हे बीएसएफमध्ये सुरक्षारक्षक दलामध्ये कार्यरत होते. त्यांच्या निधनाने कडेगांव तालुक्यात शोकाकुल परिसरली आहे. सुर्यवंशी यांच्या जाण्याने अत्यंत गुणी जवानाला आपण मुकलो आहोत, असे डॉ. कदम म्हणाले.