लातूर जिल्ह्यात रविवारी दिवसभरात दोन वेळा भूकंपाचे सौम्य

भूकंपाचा केंद्रबिंदू निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात आहे. त्या परिसरातील सुमारे दहा एक गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती पुढे आली आहे.

    लातूर : लातूर जिल्ह्यातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. लातुरच्या निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात काल (रविवारी) दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचं वातावरण होतं.

    जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी याबाबतची माहिती दिली. रविवारी पहाटे एक वाजून २७ मिनिटाला पहिला धक्का जाणवला. २.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा धक्का होता. त्यांनतर दुसरा धक्का रात्री नऊ वाजून ५७ मिनिटांनी जाणवला. १.९ रिश्टर स्केल या भुकंपाची तिव्रता होती. भूकंपाचा केंद्रबिंदू निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात आहे. त्या परिसरातील सुमारे दहा एक गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती पुढे आली आहे.