accident of bus

लातूर आगारातून मंगळवारी सकाळी एसटी (MH 20 BL 2372) पुणे-वल्लभनगरसाठी निघाली होती. ही बस मुरुडजवळ बोरगाव काळे येथे आली असताना बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यामुळे पुलावरच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

    लातूर : लातूरमध्ये (Latur) एसटी बस थेट पुलावरुन (St Bus Accident) कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात 42 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, 14 जण गंभीर आहेत. जखमींवर मुरुड ग्रामीण रुग्णालयात (Murud Hospital) उपचार सुरू आहेत. लातूरहून ही एसटी पुण्याच्या (Latur To Pune Bus) दिशेने निघाली होती. मात्र, सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस थेट पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली.

    लातूर आगारातून मंगळवारी सकाळी एसटी (MH 20 BL 2372) पुणे-वल्लभनगरसाठी निघाली होती. ही बस मुरुडजवळ बोरगाव काळे येथे आली असताना बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यामुळे पुलावरच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. पुलाचा कठडा तोडून बल खाली कोसळली. बसची समोरील बाजू मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. यामुळे आतील प्रवाशांना हादरा बसला. चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बसमधील 42 प्रवासी जखमी झाले. यातील 14 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

    अपघात होताच बोरगाव काळे शिवारातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी एसटीत अडकलेल्या प्रवाशांना बस बाहेर काढले. या शेतकऱ्यांनी रुग्णवाहिकेला संपर्क साधला. त्यानंतर रुग्णावहिकेतून जखमींना उपचारासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून 14 जणांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवासी मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. तसेच, बसचेही मोठे नुकसान झाले आहे.