कल्याणीनगरमधील एलरो पब बि ३ हॉटेलच्या मालकाकडून वकिलाला मारहाण

कल्याणीनगर भागातील बहुमजली इमारतीत असणाऱ्या हॉटेल "एलरो पब बि ३" च्या मालकांनी जेवण्यास आलेल्या एका वकिलासह त्यांच्या मित्रांवर पिस्तूल रोखत किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    पुणे : कल्याणीनगर भागातील बहुमजली इमारतीत असणाऱ्या हॉटेल “एलरो पब बि ३” च्या मालकांनी जेवण्यास आलेल्या एका वकिलासह त्यांच्या मित्रांवर पिस्तूल रोखत किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात हॉटेलचे मालक सुमीत चौधरी यांच्यासह बाऊन्सर तसेच इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनेज सतीश माने (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. १४ जुलै रोजी हा प्रकार पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील डी मार्टच्या इमारतीत आठव्या मजल्यावर “एलरो पब बि ३” हे हॉटेल आहे. तक्रारदार व त्यांचे काही मित्र याठिकाणी जेवण्यासाठी गेले होते. त्यांनी गेटवरच जेवणाबाबत विचारपूस केली. त्यावेळी सुरक्षा रक्षकांने त्यांना गेटवरच जेवण मिळणार नाही, अशी माहिती दिली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. हॉटेलचे मालक चौधरी, बाऊन्सर व इतर पाच जणांनी तक्रारदार व मित्रांना मारहाण करून त्यांच्यांवर पिस्तूल रोखत पोलीसांना बोलवतो काय असे म्हणत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.