devendra fadnavis

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यात राजकीय घडामोडी होत असताना दुसरीकडे देवेंद्र फडणीस यांचे सागर हे निवास्थान सध्या नवीन सत्तास्थापनेचा केंद्रबिंदू बनला आहे. गेल्या सहा दिवसात फडणीस यांच्या दोन दिल्लीवाऱ्या तसेच परवा रात्री व्हाया इंदोर ते बडोदा येथे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची त्यांनी विशेष भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

    मुंबई: एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोराचा गट भाजप सोबत युती करून नवीन सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या सर्व घडामोडीत राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भूमिका महत्त्वाची आहे. शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या भूकंपाने राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकलेली आहेत. देवेंद्र फडवणीस या बाबत जपून पावले टाकत आहेत.

    एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यात राजकीय घडामोडी होत असताना दुसरीकडे देवेंद्र फडणीस यांचे सागर हे निवास्थान सध्या नवीन सत्तास्थापनेचा केंद्रबिंदू बनला आहे. गेल्या सहा दिवसात फडणीस यांच्या दोन दिल्लीवाऱ्या तसेच परवा रात्री व्हाया इंदोर ते बडोदा येथे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची त्यांनी विशेष भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे २०१९ ला १०५ आमदारांचे पाठबळ असून सुद्धा राज्यात सरकार स्थापन न करू शकल्याने हतबल झालेली भाजप आत्ता या नवीन नाट्यमय घडामोडी दरम्यान सत्तास्थापनेसाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. त्यासाठी दररोज देवेंद्र फडवणीस यांच्या निवास्थानी बैठकांचे सत्र सुरू आहे. केंद्रीय मंत्री, वरिष्ठ नेते, आमदार, खासदार यांच्या भेटीगाठी दररोज फडणीस यांच्यासोबत दिसत आहेत.