विरोधी पक्ष नेते अजित पवार, आ. जितेंद्र आव्हाड यांचा कडेलोट, विजयदुर्ग किल्ल्यावरून भाजपचे अनोखे आंदोलन

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते. व त्यांना धर्मवीर म्हणावे अशी अवघ्या देशाची इच्छा आहे. असे असताना खासदार अमोल कोल्हे हे वाचून दाखवतात ती स्क्रिप्ट खरी नसते.

    सिंधुदुर्ग : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत कणकवली मतदारसंघाचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज विजयदुर्ग किल्ल्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट केला. तसेच यावेळी आमदार नितेश राणे यांनी अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका देखील केली. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते. व त्यांना धर्मवीर म्हणावे अशी अवघ्या देशाची इच्छा आहे. असे असताना खासदार अमोल कोल्हे हे वाचून दाखवतात ती स्क्रिप्ट खरी नसते. हे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी समजून घ्यावे असा टोला देखील आमदार नितेश राणे यांनी लगावला.