ॲड. सचिन जोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर ; मुंबई येथे घेणार शरद पवारांची भेट

ॲड. सचिन जोरे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

    बारामती : ॲड. सचिन जोरे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
    माजी न्यायाधीश राहिलेले ॲड. जोरे यांनी वंचित बहुजन आघाडी कडून २०१९ मध्ये इंदापूर विधानसभा निवडणूक लढवली होती व तिसऱ्या क्रमांकावर मते घेतली होती.  त्यानंतर वंचितच्या प्रदेश कमिटीवर कार्य करीत असताना महाराष्ट्रभर दौरा, मेळावे करून राज्यभर त्यांचा दांडगा लोकसंपर्क निर्माण केला आहे. एक उच्चशिक्षित न्यायाधीश म्हणून कार्यरत राहिलेले ॲड. जोरे माढा लोकसभा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.
    अलीकडील काळात मतदान मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी संपूर्ण माढा मतदारसंघात मतदान करणे हा माझा अधिकार आहे आणि मी मतदान करणारच असे मतदार जनजागृती अभियान राबवले असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.  व्यवसाय मार्गदर्शन, कायदेविषयक शिबिरे, करिअर मार्गदर्शन, शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यांनी सामाजिक कार्यात एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
    माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदार बांधव तुलनेने जास्त आहेत व सद्यस्थितीमध्ये एक धनगर समाजाचा नवा चेहरा म्हणून ओबीसी वर्गातून त्यांना वाढता पाठिंबा दिसून येत आहे.