
काल बावन्न काय एकशे बावनकुळे आले तरी ठाकरेंचे शिवसेनेसोबत नाते तोडू शकत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी चंद्रशेखर बावनकुळेंवर केली होती. याला आज चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने 100 वेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सावरकरांवरुन नौटंकी करू नये.
नागपूर – “माझे नाव सावरकर नाहीय, माझे गाव गांधी आहे, त्यामुळं मी माफी मागणार नाहीय”, असं राहुल गांधींनी म्हटल्यावर राजकीय वातावरण तापले आहे. यानंतर काल मालेगाव येथील जाहीर सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल गांधींना (Rahul gandhi) सुनावले होते. आज सामनातून देखील राहुल गांधींचे कान टोचण्यात आले आहेत. संजय राऊत माध्यमांशी बोलताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, सावरकर हे आमचे दैवत आहेत. सावरकर आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा काल जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला होता. यानंतर आज यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी एक दोन दिवसात दिल्लीला जात असून, राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना आमची भूमिका समजावून सांगणार आहे, असं राऊत म्हणाले. यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
हिंमत असले तर काँग्रेसला सोडा…
काल बावन्न काय एकशे बावनकुळे आले तरी ठाकरेंचे शिवसेनेसोबत नाते तोडू शकत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी चंद्रशेखर बावनकुळेंवर केली होती. याला आज चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने 100 वेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सावरकरांवरुन नौटंकी करू नये. हिंमत असेल तर काँग्रेसला सोडावे, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. त्यामुळ यावर आता ठाकरे गट व उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
…तर त्यांचे मी अभिनंदन करेन
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे काँग्रेसला सोडण्याची धमक दाखवतील असे वाटत नाही. उद्धव ठाकरेंनी धमक असेल तर बाहेर पडावे. उद्धव ठाकरे मविआबाहेर पडले तर मी उद्धव ठाकरेंचे जाहीर अभिनंदन करेन, असं बावनकुळे म्हणाले. सध्या सावरकरांवर राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. आम्ही कुठल्या व्यक्तीचा किंवा धर्माचा अनादर करत नाही, ही काँग्रेसची भूमिका नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं आहे.