महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री शिंदे प्रचारासाठी तेलंगणात ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात आहे मात्र आपल्या राज्याचे मुख्यमंत्री प्रचारात मग्न आहेत. आज त्यांची खरी गरज शेतकऱ्यांना आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्य तेलंगणा दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

    मुंबई : स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात आहे मात्र आपल्या राज्याचे मुख्यमंत्री प्रचारात मग्न आहेत. आज त्यांची खरी गरज शेतकऱ्यांना आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्य तेलंगणा दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले असताना . बळीराजाला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात गेले आहे. शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे, अशी परिस्थिती असताना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायला लाज नाही वाटत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे.

    काय म्हणाले उद्धव ठाकरे?
    उद्धव ठाकरे म्हणाले, पावसाने मोठं नुकसान झालं आहे. गारपिटीमुळे द्राक्ष आणि कांद्यांचं नुकसान झालं आहे. सरकारमुळे कांद्याचे शेतकरी रडकुंडीला आले होते.यंदा महाराष्ट्रात दुष्काळही आहे आणि आता अवकाळी आहे त्यामुळे राज्यावरचं संकट काही कमी होत नाही. काल एक शेतकरी मंत्र्यांना म्हणाला की तुम्ही मदत करणार असाल तर भेटायला या नाहीतर निघून जा. महाराष्ट्र उघडा पडलाय, गारपीट झाली आहे, शेतकऱ्याची वाताहात झाली आणि तुम्ही तेलंगाणात प्रचाराला जाता, लाज नाही वाटत..आणि मग स्वतःच्या पंचतारांकित शेतीबद्दल सांगता. हवामान खात्यानं इशारा दिला होता की, या काळात अवकाळी पाऊस पडेल मग सरकारनं काय केलं?, असा सवाल त्यांनी केला.

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त : उद्धव ठाकरे
    महाराष्ट्रात सरकार नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहे. मोदी महाराष्ट्रात येत का नाही? शेतकऱ्यांकडे देखील बघत नाही. राज्यात काही तालुक्यात दुष्काळ जाहिर केला त्यासाठी काय केलं? मुंबईत पाण्याचा नाश करत आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं हे सरकारचा तेरावा महिना आहे. गद्दारांचे पुनर्वसन कसं करायचं यावरच त्यांचे लक्ष आहे य जो व्यक्ती आपल्या राज्यात शेतकऱ्यांची मदत करत नाही तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.