विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटाला इशारा; म्हणाल्या…

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे  यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नाव किंवा शिवसेनेचे चिन्ह मिळणार असे पसरवले जात आहे. मात्र, शिवसेनेची घटना आहे. ती निवडणूक आयोगाच्या नुसार तयार केली आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह बंडखोरांना मिळणार नाही, असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाला दिला आहे.

    मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्यासोबत काही आमदारांना (MLA)  घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भाजपसोबत (Bjp) सत्ता स्थापन करावी, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे भाजपच्या नेत्यांसोबत पुढची रणनीती आखणार असल्याचेही कळते आहे.

    दरम्यान या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे  यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नाव किंवा शिवसेनेचे चिन्ह मिळणार असे पसरवले जात आहे. मात्र, शिवसेनेची घटना आहे. ती निवडणूक आयोगाच्या नुसार तयार केली आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह बंडखोरांना मिळणार नाही, असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाला दिला आहे.

    नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या?

    १० वी अनुसूची आहे. त्या प्रतीनुसार,ज्या लोकांनी विधानसभेमध्ये वेगळी भूमिका घेतली असेल तर ती अपात्र ठरते. आमदारकी रद्द व्हायची नसेल तर कुठल्या तरी गटात विलीन व्हावे लागेल. विलीन झाले नाहीत तर अपात्रतेपासून सुटका होणार नाही, पक्षांतर बंदीच्या कायद्यापासून सुटका व्हायची आहे, असे जर वाटत असेल तर त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या पक्षात विलीन व्हावे, स्वतःचा गट स्थापन करावा लागेल. शिवसेना हे नाव मूळच्या पक्षाचं वापरता येणार नाही.

    तसच यावेळी गोऱ्हे पुढे म्हणाल्या, भाजपत तरी विलीन व्हावे लागेल किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार संगटनेत विलीन व्हावे लागेल. गैरसमज पसरवला जात आहे.शिवसेना नाव किंवा शिवसेनेचे चिन्ह मिळणार असे पसरवले जात आहे. शिवसेनेची घटना आहे.ती निवडणूक आयोगाच्या नुसार तयार केली आहे.विधीमंडळ पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा आहे. शिवसेनेचा पक्ष आहे, सहा टक्के मते मिळवावी लागली आहे.

    वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये जोपर्यंत ४ ते सहा टक्के मते मिळत नाहीत, तोपर्यंत चिन्ह गोठवणं किंवा मिळवणं असं करत नाहीत. त्यांना निवडणूक आयोगाकडे जायचं असेल तर ते जाऊ शकतात. बहुमत आमच्याकडे आहे. आमचे एकमत आहे. उद्धव ठाकरे यांनीच अध्यक्ष राहावं. ज्यांना भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील किंवा बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखालील राहायचं असेल तर त्यांनी पक्षाचा भगवा खांद्यावरून उतरवलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता सर्व निर्णय विधीमंडळात होणार आहेत. कायद्याप्रमाणं पाऊलं उचलली जातील, असाही इशारा गोऱ्हे यांनी दिला आहे.