विधानपरिषद निवडणूक : ४ वाजेपर्यंत एकूण अंतिम मतदान २८५, बाजी कोण मारणार? सर्वांना उत्सुकता

कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांनी उशिरा मतदान केले. ही महाविकास आघाडीची रणनिती असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आणि दुपारी तीन वाजेपर्यंत 279 आमदारांनी मतदान केलं होतं. तर मतदानाची शेवटची वेळ संध्याकाळी चार पर्यंत होती. चार वाजेपर्यंत 285 आमदारांनी मतदान केलं आहे. सांयकाळी चार वाजेपर्यंतच मतदानाची वेळी होती. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि रात्री 8.00 वाजता निकाल स्पष्ट होईल. त्यामुळं कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे.

    मुंबई : आज विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली आहे. आता थोड्याच वेळात म्हणजे रात्री 8 वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार आहे. या जागेसाठी भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांनी एक-एक मतांसाठी अपक्षांची मनधरणी करत आहेत. तसेच मतांच्या जुळवाजुळवीसाठी आमदारांना मागील काही दिवसांपासून आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. भाजप व मविआने जोरदार फिल्डिंग (For one one vote MVA and BJP fielding) लावली आहे. यावर आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मतदानाची वेळ सांयकाळी चार वाजेपर्यंत होती. ही वेळ संपली असून आता निकालाची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे.

    दरम्यान, सकाळी 11 वाजेपर्यंतचे एकूण 142 आमदारांनी मतदान केले होते, तर दुपारी 12 वाजेपर्यंतचे एकूण मतदान झाले होते. दुपारी 1 वाजेपर्यंतचे एकूण मतदान झाले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत 275 आमदारांनी मतदान केलं होतं. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांनी उशिरा मतदान केले. ही महाविकास आघाडीची रणनिती असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आणि दुपारी तीन वाजेपर्यंत 279 आमदारांनी मतदान केलं होतं. तर मतदानाची शेवटची वेळ संध्याकाळी चार पर्यंत होती. चार वाजेपर्यंत 285 आमदारांनी मतदान केलं आहे. सांयकाळी चार वाजेपर्यंतच मतदानाची वेळी होती. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि रात्री 8.00 वाजता निकाल स्पष्ट होईल. त्यामुळं कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे.

    दरम्यान, राज्यातील एकूण 288 मतदारसंघ आहेत, त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे सध्या तुंरुगात आहेत, अंधेरी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे मागील महिन्यात निधन झाले आहे. त्यामुळं 288 पैकी 285 आमदाराचेंच मतदान होणार आहे. सांयकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्यामुळं ही चारची वेळ संपली आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि रात्री 8.00 वाजता निकाल स्पष्ट होईल. त्यामुळं कोण बाजी मारणार, भाजप की मविआ याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. थोड्याच वेळात निकाल हाती येईल.

    काय आहे सध्या मतांचे समीकरण?

    शिवेसना

    स्वत:ची मते     ५५
    अपक्षांची मते     ७
    एकूण     ६२

    राष्ट्रवादी
    स्वत:ची मते     ५१
    अपक्षांची मते     ४
    एकूण     ५५

    काँग्रेस
    स्वत:ची मते     ४४
    अपक्षांची मते     ००
    एकूण     ४४
    दोन जागांसाठी मते हवी     ८

    भाजप 
    स्वत:ची मते     १०६
    अपक्षांची मते     ६
    एकूण     ११२