Leopard attacks woman! However, two dogs rescued the woman's life by returning the leopard

बांधोना येथील प्रेमीला शामराव किरंगे ही महिला सकाळी ६ वाजताच्या सुमारास शौचालयाकरीता गावानजीकच्या जंगलात गेली होती. दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सदर महिलेवर हल्ला चढविला. बिबट्याचा हल्ला होताच सदर महिला प्रतिकार केला तसेच तिच्यासोबत असलेल्या २ कुत्र्यांनी बिबट्याचा हल्ला परतवून लावला.

    धानोरा : उत्तर धानोरा वनपरिक्षेत्रअंतर्गत (Under Dhanora Forest Reserve) येणाऱ्या मुस्का उपक्षेत्रातील बांधोना (Bandona in Muska sub-regio) येथील महिलेवर बिबट्याने हल्ला (leopard attacked Woman) करुन जखमी केल्याची घटना १ जुलै रोजी घडली. मात्र महिलेसोबत असलेल्या दोन कुत्र्यांनी बिबट्याच्या हल्ल्यातून महिलेला सोडविल्याने (Two dogs rescue a woman from a leopard attack ) सुदैवाने तिचे प्राण बचावले आहे.

    त्यामुळे, बिबट्या जंगलात पळून गेल्याने सुदैवाने महिलेचे प्राण वाचले. हल्ल्यामध्ये महिलेच्या तोंडावर जखमा झाल्या असून तिला उपचारासाठी गडचिरोली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.

    घटनेची माहिती मिळताच, वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत मेडेवार, क्षेत्र सहाय्यक करेवार, प्रवीण मेश्राम, वनरक्षक विकास कुमरे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी महिलेची विचारपूस केली. जखमी महिलेस उत्तर धानोराचे वनपरीक्षेत्र अधिकारी वसंत मेडेवार यांनी उपचाराकरीता सानुग्रह मदत दिली.