गुळाणी घाटात पाच दिवसांपासून धुमाकूळ घालणारा ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद

गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी गुळाणी घाटात दिसून आलेला बिबट्या अखेर वनविभागाकडून जेरबंद करण्यात आला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.  

    चाकण : गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी गुळाणी घाटात दिसून आलेला बिबट्या अखेर वनविभागाकडून जेरबंद करण्यात आला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

    गुळाणी घाट, वरची भांबुरवाडी, टाकळकरवाडी खालची भांबुरवाडी, जवुळके, रेटवडी या गावांच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांनी येथील रहिवाशांना घराबाहेर पडने मुश्कील करुन ठेवले होते. स्थानिक शेतकऱ्यांनी या बिबट्याचा चांगलाच धसका घेतला होता. एवढी दहशत आणि हल्ले वाढले होते. या बिबट्यांनी अनेकांवर झडप घालून जबर जखमी केले होते.

    तसेच पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडलेला होता, त्यामुळे या बिबट्यांची दहसत संपविण्यासाठी हे बिबटे बंदिस्त करणे आवश्यक गरजेचे झालेले होते. शेवटी वनविभागाच्या टिमने शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला. महत्प्रयासाने तो जेरबंद झाला. यामुळे तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पण तरीही अजुनही एक बिबट्या या परिसरात वावरत आहे, अशी येथील लोकांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे.