भर कल्याण शहरात बिबट्याची दहशत, इमारतीत स्थानबद्ध; वनविभागाकडून जेरबंद करण्यासाठी प्रयत्न

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. मात्र, शेजारीच हाजी मलंगचा विस्तीर्ण घनदाट जंगलाचा डोंगर भाग आहे. या भागातून हा बिबट्या आला असण्याची शक्यता व्यक्त आहे. मात्र, बिबट्याच्या प्रवेशाने कल्याण पूर्व भागात भीतीचे वातावरण आहे.

    कल्याण – कल्याण शहराच्या (Kalyan City) पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात चिंचपाडा रोड येथील अनुग्रह टावर या इमारतीत बिबट्या (Leopard) शिरल्याची खळबळ घटना समोर आली आहे. वनविभागाचे कर्मचारी (Forest Department), पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला जेरबंद (Imprisonment) करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. मात्र, शेजारीच हाजी मलंगचा विस्तीर्ण घनदाट जंगलाचा डोंगर भाग आहे. या भागातून हा बिबट्या आला असण्याची शक्यता व्यक्त आहे. मात्र, बिबट्याच्या प्रवेशाने कल्याण पूर्व भागात भीतीचे वातावरण आहे. काही वर्षांपूर्वी लोकसंख्येची दाट घनता असलेल्या उल्हासनगर शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी एका घरात बिबट्या शिरला होता.

    बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याला सध्या एका ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले असून इमारतीतील सर्व रहिवाशांना दारे खिडक्या बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यालयातून वन विभागाचे पथक दाखल होतात बिबट्याला जेर बंद केले जाईल, अशी माहिती कल्याणचे वनक्षेत्रपाल संजय चन्ने यांनी दिली आहे.