ग्रामपंचायत महिला सदस्यांना मुक्तपणे काम करू द्या : दिलीप स्वामी

देशांचे स्वातंत्र्यानंतर घटना तयार करण्याचे काम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. संविधानामुळे समान संधी मिळाली आहे. तरीही मुली व महिलांना मुक्तपणे काम करण्याची संधी द्या, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

    सोलापूर : देशांचे स्वातंत्र्यानंतर घटना तयार करण्याचे काम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. संविधानामुळे समान संधी मिळाली आहे. तरीही मुली व महिलांना मुक्तपणे काम करण्याची संधी द्या, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. सोलापूर जिल्हा परिषद मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आवारातील संविधान स्तंभास मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुष्प अर्पण करून आदर व्यक्त केला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

    या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी संजय जावीर, समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, कास्टाईब संघटनेचे अरूण क्षीरसागर, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अधिक्षक चंद्रकांत होळकर, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे संस्थापक राजेश देशपांडे , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , समाजकल्याण अपंग विभागाचे सच्चिदानंद बांगर, अधिक्षक सचिन सोनकांबळे यांचे सह शालेय विद्यार्थी व विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उद्देशीकेचे वाचन करण्यात आले.

    आज ग्रामीण भागातील मुलींना शाळेत येण्यासाठी सायकल नाही. असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, सर्व जात धर्म. पंथ विसरून समानता प्रस्थापित करण्याचे काम संविधानाने केले आहे. तरीही आज मुलींपेक्षा मुलांना संधी दिली जाते. मुलींना साधी सायकल मिळू शकत नाही. सायकल घेण्याची परिस्थिती नाही असे नाही परंतू महिलांविषयी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. ताठ मानेने जगतां आले पाहिजे. सायकल बॅंक मुंलीसाठी सुरू केली आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या योजना सर्व घटकापर्यंत पोहचल्या पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी शासकीय योजनाच असायला पाहिजे, असे नाही सायकल बॅंके सारखे लोकवर्गणी तून उपक्रम राबविले गेले पाहिजे. आज जिल्हयात ३ हजार सायकली जमा झाले आहेत. किमान २ कोटी रूपयांची मदत सायकल बॅंकेसाठी लोकांनी दिली आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

    महिला सदस्यांना मुक्तपणे काम करू द्या : स्वामी

    ग्रामपंचायती मध्ये महिला ग्रामपंचायत सदस्य सरपंच असतात. ५० टक्के पंचायत राज मध्ये आरक्षण आहे. या महिला सदस्यांना मुक्तपणे काम करू, द्या असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी आज जिल्हा वासियांना केले. प्रास्तविक विस्तार अधिकारी गुरव यांनी केले.