उदयनराजेंचे कुठं कुठं मन लागत नाही, याची खासगीत माहित द्या ; शरद पवारांचा टोला

उदयनराजेंचे कुठं कुठं मन लागत नाही, याची मला एकदा खासगीत माहित द्या, असे शरद पवारांनी सांगत उदयनराजे यांना चिमटा काढला.सातारा शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच पाच राज्यातील निकालावर जपून भाष्य केले. यावेळी उदयनराजे यांच्यावरील प्रश्नावर त्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले.

    सातारा : उदयनराजेंचे कुठं कुठं मन लागत नाही, याची मला एकदा खासगीत माहित द्या, असे शरद पवारांनी सांगत उदयनराजे यांना चिमटा काढला.सातारा शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच पाच राज्यातील निकालावर जपून भाष्य केले. यावेळी उदयनराजे यांच्यावरील प्रश्नावर त्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले.

    सातारा लोकसभेसाठी भाजप, अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शिवसेना ही उमेदवार उभा करणार आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी गोची होणार आहे, त्यामुळे त्यांना तुम्ही राष्ट्रवादीत घेणार का या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, इतर पक्षांनी कोणाला उभे करायचे हा त्यांचा प्रश्न आहे,आम्ही आमचा उमेदवार उभा करणार, कोणाला बरोबर घेऊन उमेदवार उभा करणार, आणि निवडून कसा आणायचा हाच पेच आमच्या पुढे आहे. बाकीच्यात आम्ही लक्ष घालत नाही.

    खासदार उदयनराजे भोसले हे सध्या भाजपवर नाराज असून त्यांचे मन लागत नाही, त्यामुळे आगामी लोकसभेसाठी त्यांना राष्ट्रवादीत घेणार का, असा आमचा प्रश्न होता असे पवार यांना संगण्यात आल्यावर या प्रश्नावर खासदार शरद पवार यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले.पवार म्हणाले, त्यांचे कुठं कुठं मन लागत नाही याची खासगीत माहित मला द्या, असे शरद पवार म्हणतच म्हणताच एकच हशा पिकला.