‘एकदा काय ते होऊनच जाऊ द्या’, पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेचा टीझर लाँच, काय आहे टिझरमध्ये? ‘पाहा’

आपण सर्वजण 22 मे रोजी पुण्यात या, यावर बोलू असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र दौरा रद्द यावर आता राजकीय क्षेत्रातून विविध पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. बृजभूषण यांच्या विरोधामुळं हा दौरा स्थगित केला का अशी जोरदार सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यातच आता राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेचा टीझर लाँच झाला आहे. या टिझरवरुन पुण्यातील सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

    मुंबई : मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित अयोध्या दौरा अखेर स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी एक टिव्ट करत अयोध्या दौरा रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. तसेच आपण सर्वजण 22 मे रोजी पुण्यात या, यावर बोलू असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र दौरा रद्द यावर आता राजकीय क्षेत्रातून विविध पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. बृजभूषण यांच्या विरोधामुळं हा दौरा स्थगित केला का अशी जोरदार सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यातच आता राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेचा टीझर लाँच झाला आहे. या टिझरवरुन पुण्यातील सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, या टीझरमध्ये राज ठाकरे यांच्या औरंगाबदच्या सभेतील ‘एकदा काय ते होऊनच जाऊ द्या…’ हे वाक्य वापरले असून, कार्यकर्त्यांनी यावर वाजवलेल्या टाळ्या, शिट्या यांच्या सुद्धा व्हीडिओ या टिझरमध्ये वापरण्यात आला आहे. तसेच राज ठाकरे यांची हिंदूजननायक ही प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली आहे. राज ठाकरे आरती करतानाचा फोटो तसेच “बुडाला औरंग्या पापी, म्लेंछसंव्हार जहाला, मोडली मांडली छत्रे…आनंदवनभुवनी…” असा फोटो सुद्धा लावण्यात आला आहे. यावरुन राज ठाकरे हे सत्ताधारी तसेच जे भोंग्यावरुन राजकारण सुरु आहे, त्यांच्या समाचार घेणार असल्याचं कळते. यावरुन ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

    रविवारी 22 तारखेला पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे रविवारी सकाळी १० वाजता राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत राज ठाकरे अयोध्या दौरा अचानक स्थगित का केला, याविषयी कारण स्पष्ट करतील. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना या सभेला येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे राज ठाकरे या सभेत काय बोलणार, कोणावर तोफ डागणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तसेच अयोध्या दौरा का स्थगित केला, आगामी रणनिती यावर सुद्धा राज ठाकरे बोलणार असल्याची सुत्रांची माहीती आहे.