मूठभरांची जावो, प्रजेची सत्ता येवो!, देशात प्रजेचं राज्य कधी येणार? सामनातून केंद्र व राज्य सरकावर टिका

ज्या कारणासाठी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, त्या सामान्य प्रजेला, शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतमजुरांना, कामगार-कष्टकऱ्यांना, बेरोजगार तरुणांना ही प्रजेची सत्ता आहे, असे खरोखरच वाटते आहे काय? प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाचा आनंद गाव, खेडी, तांडे, वस्त्यांवरील गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर दिसतो आहे का?

  मुंबई- आज देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन (Republic Da) साजरा होत आहे. मात्र अजून जनतेचं राज्य नाही, अशी टिका सामनातून (Saamana) आज करण्यात आली आहे. निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र 74 व्या प्रजासत्ताक दिनी दिसत असले तरी भविष्यात बदल घडवावाच लागेल. मूठभरांसाठी काम करणारी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल. घटनाकारांना अपेक्षित असलेला प्रजासत्ताक दिन ‘चिरायू’ ठेवायचा असेल तर मूठभरांची सत्ता जावो आणि प्रजेची सत्ता येवो, हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावेच लागेल! असं सामनातून म्हटलं आहे.

  जनतेचे जगण्या-मरण्याचे असंख्य प्रश्न

  दरम्यान, देशाचा ७४ व्या प्रजासत्ताक दिन आज सवत्र साजरा होईल. शाळा, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जरूर ओसंडून वगैरे वाहताना दिसेल, पण ज्या कारणासाठी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, त्या सामान्य प्रजेला, शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतमजुरांना, कामगार-कष्टकऱ्यांना, बेरोजगार तरुणांना ही प्रजेची सत्ता आहे, असे खरोखरच वाटते आहे काय? प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाचा आनंद गाव, खेडी, तांडे, वस्त्यांवरील गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर दिसतो आहे का? हिंदुस्थान हे लोकशाही राष्ट्र आहे आणि इथे प्रजेची सत्ता आहे, असा शब्द देशातील जनतेला देउन आजच्याच दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपण राज्यघटना स्वीकारली. तेव्हापासून आजतागायत आपण 73 प्रजासत्ताक दिन साजरे केले. दरवर्षी महामहिम राष्ट्रपती महोदय दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवून देशाला उद्देशून भाषण करतात. ‘रिपब्लिक डे’ परेड होते, विविध राज्यांचे सांस्कृतिक , दर्शन घडवणारे चित्ररथ दौडतात, लष्करी जवानांचे चित्तथरारक स्टंट पाहायला मिळतात. हे सगळे सालाबादप्रमाणे आजच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनीदेखील राष्ट्रपतींचे लाल किल्यावरील भाषण होईल, पण ज्या जनतेचे जगण्या-मरण्याचे जे असंख्य प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे त्यातून मिळणार आहेत का? हे प्रश्न जर 74 व्या प्रजासत्ताक दिनीही कायमच असतील, अशी जळजळीत टिका सामनातून आज करण्यात आली आहे.

  विषमतेची व्यवस्था म्हणजे प्रजासत्ताक देश म्हणावे काय?

  किंबहुना या प्रश्नांचे काहूर अधिकच माजत असेल तर आपल्या देशात खरोखरच प्रजेची सत्ता अस्तित्वात आहे, असे कसे म्हणता येईल? गेल्या सत्तरेक वर्षांत देशात अनेक चांगले बदल नक्कीच झाले. हरित क्रांती आली, औद्योगिक क्रांती आली, वैज्ञानिक क्रांतीचे लाभ आणि आधुनिकीकरण असे चांगले बदल निश्चितच झाले. तथापि, या बदलांचा मोठा लाभ कुणाला झाला? केवळ मुंबई, दिल्ली, बंगलोर, कोलकाता येथील उंच टॉवर आणि चमकधमक म्हणजेच काही हिंदुस्थान नव्हे! या महानगरांच्या पलीकडे जो खंडप्राय देश पसरला आहे, तेथील जनतेचे काय?

  तरुण बेरोजगारीने ग्रासलाय…

  देशातील श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब आणखी गरीब! ही विषमतेची व्यवस्था म्हणजे प्रजासत्ताक देश म्हणावे काय? घटनाकारांना असे प्रजासत्ताक अपेक्षित होते काय, असा प्रश्न राज्यकर्त्यांनी आपल्या मनाला विचारला करणाऱ्या ‘ऑक्सकॉम इंटरनॅशनल’ या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला. त्यात देशातील २१ लोकांकडे ७० कोटी लोकांपेक्षा अधिक संपत्ती आहे. देशातील तरुण वर्ग आज बेरोजगारीने ग्रासला आहे. त्यांना नोकरी नाहीय, मूठभरांसाठी सत्ता उलथवून खरेखुरे जनतेचे राज्य यावे यासाठी देशातील प्रजेलाच आता एकजूट दाखवावी लागेल. घटनाकारांना अपेक्षित असलेला प्रजासत्ताक दिन ‘चिरायू’ ठेवायचा असेल तर मूठभरांची सत्ता जावो आणि प्रजेची सत्ता येवो, हे विद्यमान राज्यकर्त्यांना ठणकावून सांगावेच लागेल! असं सामनातून म्हटलं आहे.