आषाढी वारीची ही वैभवशाली परंपरा निरंतर राहू दे : आमदार महेश लांडगे

आळंदी- भोसरी पालखी मार्गावर मॅगझिन चौक येथे पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. आषाढी वारी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी ज्ञानोबा- तुकाराम असा जयघोष करीत आणि टाळ- मृदंगाच्या गजरात पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण केले.

    पिंपरी – कोविडच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत आषाढी वारी पालखी सोहळा झाला नाही. मात्र, यावर्षी अत्यंत उत्साहाने राज्यभरातील वारकरी या भक्तीच्या मेळ्यात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राची ही वैभवशाली परंपरा अशीच निरंतर कायम राहू दे, अशी प्रार्थना पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी करुयात, अशी भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

    आळंदी- भोसरी पालखी मार्गावर मॅगझिन चौक येथे पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. आषाढी वारी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी ज्ञानोबा- तुकाराम असा जयघोष करीत आणि टाळ- मृदंगाच्या गजरात पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण केले. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांचा सन्मान करण्यात आला. तसेच, प्रथमोपचार पेटी, फराळ, जीवनावश्यक वस्तुंचे कीट, छत्री, रेनकोट आदी वाटप करण्यात आले.