औरंगजेबच्या कबरीपुढे माथा टेकवणाऱ्या ओवैसींचा त्याच मातीत शेवट करु – संजय राऊत

औरंगाबादमध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतली होती. सभेपूर्वी त्यांनी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतलं आहे. यावरुन आता वाद निर्माण झाला असून, वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावरच आता विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा आमदार नितेश राणेंनी ओवीसींना थेट आव्हान देत राज्य सरकारवर सुद्धा बोचरी टिका केली आहे. त्यानंतर आज संजय राऊतांनी सुद्धा ओवीसी बुंधुवर टिकास्त्र डागले आहे.

    मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, गुरुवारी त्यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट देत, कबरीवर फुले चढवल्याचा फोटो व्हायरल होत आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतली होती. सभेपूर्वी त्यांनी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतलं आहे. यावरुन आता वाद निर्माण झाला असून, वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावरच आता विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा आमदार नितेश राणेंनी ओवीसींना थेट आव्हान देत राज्य सरकारवर सुद्धा बोचरी टिका केली आहे. त्यानंतर आज संजय राऊतांनी सुद्धा ओवीसी बुंधुवर टिकास्त्र डागले आहे.

    दरम्यान, यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ओवैसी बंधूंवर निशाणा साधला आहे. औरंगजेबाला मराठ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडले आहे. तुम्ही जर आम्हाला आव्हान देणार असाल तर आम्ही तुमचे आव्हान स्वीकारुन त्याच मातीमध्ये गाडू तुमचा सुद्धा औरंगजेबप्रमाणे याच मातीत शेवट करु असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वारंवार यायचं संभाजीनगरला आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला आणि महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे यातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असा या ओवैसी बंधूचे राजकारण दिसत आहे. यांना वेळीच आवर घातला पाहिजे अन्यथा आम्ही यांना मातीत गाडू असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

    औरंगजेब संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केले आणि महाराष्ट्रातील मंदिर प्रार्थना स्थळे उद्धवस्त केली. महाराष्ट्रात तुम्ही येऊन कबरीचे दर्शन घेऊन प्रार्थना कराल तर हे महाराष्ट्राला आव्हान देण्यासारखे झाले आहे. आम्ही आव्हान स्वीकारले असल्याचे समजा, औरंगजेबला याच मातीत जावे लागले होते. त्यांच्या भक्तांनासुद्धा याच मातीत जावे लागेल. महाराष्ट्राची माती मर्दांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माती आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत. एमआयएमचे खासदार अकबरूद्दीन औवेसींनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण उपस्थित होते.