चला चिमण्या वाचवूया, स्पॅरोज शेल्टरचे मुंबईकरांना आवाहन

तिळातील स्नेह आणि गुळातील गोडवा निर्माण व्हावा या उद्देशाने हा सण साजरा करा नव्हे की, पतंग (Kite) आणि मांजाने (Manja) पक्ष्यांना जखमी करून असे त्यांनी म्हटले आहे. या दिवशी धारदार मांज्यामुळे चिमण्या व इतर पक्षी जखमी होतात. अनेकदा त्यांच्या जीवावरही बेतते. यामुळे मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी पतंग उडवणे टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या आधीच कमी होऊ लागली आहे.त्यामुळे पक्षांना वाचविण्याचे प्रयत्न नागरिकांनी केले पाहिजेत.

    मुंबई : मकरसंक्रांत (Makar Sankranti) हा पर्वकाळ म्हणजे विशेष पुण्यकाळ मानला जातो, त्यामुळे या दिवशी खास करून आनंदोत्सव साजरा केला जातो. मुंबईतील चिमण्या आणि पक्षी (Sparrows And Birds) यांना पतंगाच्या मांज्यामुळे (Kite Manja) त्रास होऊ नये याची काळजी घेऊन त्यांचे प्राण वाचवावे असे आवाहन स्पॅरोज शेल्टरचे (Sparrow Shelter) अध्यक्ष प्रमोद माने यांनी मुंबईकरांना केले आहे.

    तिळातील स्नेह आणि गुळातील गोडवा निर्माण व्हावा या उद्देशाने हा सण साजरा करा नव्हे की, पतंग (Kite) आणि मांजाने (Manja) पक्ष्यांना जखमी करून असे त्यांनी म्हटले आहे. या दिवशी धारदार मांज्यामुळे चिमण्या व इतर पक्षी जखमी होतात. अनेकदा त्यांच्या जीवावरही बेतते. यामुळे मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी पतंग उडवणे टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या आधीच कमी होऊ लागली आहे.त्यामुळे पक्षांना वाचविण्याचे प्रयत्न नागरिकांनी केले पाहिजेत.

    या दिवशी कमीतकमी पतंग उडवून व धारदार मांज्याचा वापर टाळून पक्ष्यांना वाचविण्यासाठी हातभार लावावा.असे त्यांनी आवाहन केले आहे. पतंग उडविताना जखमी होणाऱ्या पक्ष्यांवर उपचार करण्याचे कामही यापूर्वी ‘स्पॅरोज शेल्टर’च्या माध्यमातून करण्यात आले आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी संस्थेच्या स्वयंसेवकांना पोहचणे शक्य होत नाही. तेव्हा प्रत्येकाने पतंग उडवताना याची खबरदारी घ्यायला हवी असे आवाहनही माने यांनी केले आहे.

    चायनिज मांजाला अत्यंत धार असल्याने पक्षी जखमी होण्यासह त्यांचा बळी जाऊ शकतो अशी भीती ‘स्पॅरोज शेल्टर’ ने व्यक्त केली आहे. केवळ मकरसंक्रांतीदिनीच नाही, तर नंतर देखील वृक्षांना लटकलेल्या मांजामध्ये पक्षी अडकून जखमी होतात. वेळप्रसंगी त्यांचा मृत्यू देखील होतो. आपण हे सर्व टाळू शकतो. यासाठी प्रत्येकांनी मुंबईतील पशु पक्षी यांच्या जीवीतांचे रक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम करावे असे त्यांनी म्हटले आहे.