वाळू उपसासाठी सकारात्मक निर्णय घेऊ ;  राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

सातत्याने येणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रणासाठी नदी पात्रातील वाळू उपसा करणेसाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. तर दगड खाणी व क्रशरसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाच्या जाचक अटींना स्थगिती मिळाल्याने गौण खनिज व्यवसाय पूर्ववत होईल असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

    पेठ वडगाव : सातत्याने येणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रणासाठी नदी पात्रातील वाळू उपसा करणेसाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. तर दगड खाणी व क्रशरसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाच्या जाचक अटींना स्थगिती मिळाल्याने गौण खनिज व्यवसाय पूर्ववत होईल असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

    मंत्रालयात खा. धैर्यशील माने यांच्यासोबत हलकणंगले, शिरोळ, पन्हाळ्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील दगड खाण व वाळू व्यवसायिकाबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले. शासनाच्या सकारात्मक भूमिकेने दगड, खाण, वाळू व्यवसायिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

    वाळू ऊपशाबाबत पर्यावरण विभागासह तज्ञांशी चर्चा करु                
    मंत्रालयात विखे पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महसूलचे वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह खा. धैर्यशील माने, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार गौणखनीज व वाळू व्यवसायिक उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत हरित लवादाच्या निर्बंध व नवीन अटीमुळे अडचणीत आलेला गौण खनीज व्यवसाय राज्य शासनाच्या सकारात्मक धोरणामुळे पूर्ववत होईल असे सांगितले. तर सततच्या पूर परिस्थिती व ऊथळ नदी पात्र यामुळे पात्रातील वाळू ऊपशाबाबत पर्यावरण विभागासह तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेवू जेणेकरून नदीपात्र खोल झाले पूरनियंत्रणास मदत होईल.

    तसेच राज्यातील व केंद्र शासनाकडून मोठया प्रमाणात सुरु असलेली पायाभूत सुविधांची कामे व त्यास येणाऱ्या गौण खणी ज ऊत्खनन व वापरावर हरित लवादाच्या निर्णयामुळे आलेल्या निर्बंधावर न्यायालयीन तसेच केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील गौण खनिज व्यवसाय पूर्व पदावर येईल. तसेच पारंपारिक व्यवसायिक असलेला वडार समाजाला ऊभारी देणे साठी कुटुंबाला २०० ब्रास रॉयल्टी माफ सह येणाऱ्या अडचणी वर जिल्हाधीकारी यांचे पातळीवर निपटारा करुन दिलासा देणार असलेचे सांगितले. या बैठकीसाठी खा. धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली व तानाजी पोवार इचलकरंजी यांचे सह अॅड. शाहू काटकर रमेश कलकुटकी, अबूब डागे, अभिजीत पवार, संजय शिंगाडे, रसिक दायमा, शिवाजी शिंगाडे, सुरेश पवार, केतन नाईक, शांतीकुमार पाटील यांच्यासह गौण खनिज व्यवसायिक उपस्थित होते.