Life imprisonment for the murder of his wife! Important verdict of Pusad court, murder due to suspicion of character

आरोपी पांडुरंग साहेबराव कबले यांचे सोबत जून २०१३ मध्ये नागापूर रूपाला येथील प्रल्हाद दिगंबर बुरकुले यांच्या पद्मा नामक मुलीचा विवाह झाला होता. लग्नाच्या एक महिन्यानंतरच पत्नीस चारित्र्याच्या संशयावरून शारीरिक मानसिक त्रास (physical mental distress) देत होता.

  पुसद :  चारित्र्याच्या संशयावरून (Doubts of character) पत्नीचा खून करून नंतर जाळून टाकून कुणाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून करंट लागण्याचा बनाव करणाऱ्या आरोपीस विद्यमान जिल्हा न्यायाधीश -१ राजेश अस्मर (District Judge-1 Rajesh Asmar) यांचे न्यायालयाने आरोपी सश्रम जन्मठेपेची शिक्षा (Sentenced to rigorous imprisonment for life) ठोठावली.

  पांडुरंग साहेबराव कबले असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. उमरखेड तालुक्यातील पोफळी पोलीस स्टेशन (Pofali Police Station) अंतर्गत येत असलेल्या आडद येथील रहिवासी आरोपी पांडुरंग साहेबराव कबले यांचे सोबत जून २०१३ मध्ये नागापूर रूपाला येथील प्रल्हाद दिगंबर बुरकुले यांच्या पद्मा नामक मुलीचा विवाह झाला होता. लग्नाच्या एक महिन्यानंतरच पत्नीस चारित्र्याच्या संशयावरून शारीरिक मानसिक त्रास (physical mental distress) देत होता. कबले दांपत्य अडीच महिन्याच्या मुलासह आडद येतील शेतातील घरात राहत होते.

  अशातच २२ डिसेंबर २०१४ रोजी पद्मना हिला करंट लागून मृत्यू झाल्याची माहिती कळाल्याने माहेरची मंडळी सासरी पोहोचली. या घटनेबाबत प्रथम आडगावचे पोलीस पाटील यशवंत संभाजी कबले यांनी पदमिना मरण पावलेली असल्याबाबतची माहिती पोलीस स्टेशन पोफाळीला दिली.

  २३ डिसेंबर २०१४ रोजी प्रल्हाद दिगंबर बुरकुले यांनी पदमिनाला नवरा चरित्रावर संशय घेऊन मारहाण करून तिला जाळून मारले असल्या बाबतचा रिपोर्ट दिला. त्या तक्रारीवरून आरोपी पांडुरंग कबले यांचे विरुद्ध भादवीचे कलम ३०२, २०१, ४९८ अ च्या गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण राऊत यांनी तर संपूर्ण तपास सहायक पोलीस निरीक्षक सरदार सिंग ठाकूर यांनी करून विद्यमान न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
  सदर मामला जिल्हा व सत्र न्यायालयात पुराव्यासाठी आला असता सरकारी अभियोक्ता ॲड रवी केशवराव रूपुरकर (Public Prosecutor Adv Ravi Keshavrao Roopurkar) यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले. आरोपीची पहिली पत्नी व मयताचे वडील व आई यांच्या साक्षावरून सिद्ध झाले. तसेच डॉक्टर प्रीती जयस्वाल वैद्यकीय अधिकारी (Dr Preeti Jaiswal Medical Officer) उमरखेड यांची साक्ष आरोप सिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

  या सर्व परिस्थितीतजन्य बाबी व सरकारी वकिलांनी आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर केल्याने विद्यमान न्यायालयाने आरोपी विरुद्ध ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यामुळे आरोपी दिगंबर कबले यास पत्नीचा खून केल्याप्रकरणी सशत्र जन्मठेपेची शिक्षा व पाच हजाराचा दंड ठोठवला तर खुनाचा पुरावा नष्ट केल्या प्रकरणी तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड ठोठावला. तसेच पत्नीस शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड ठोठवल्याचा निकाल दिला. दंडाच्या दहा हजाराची रक्कम आईच्या प्रेमास मुकल्यामुळे मयताचे मुलास देण्याबाबतचा निकाल जाहीर केला. याप्रकरणी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून एडवोकेट रवी रूपुरकर यांनी बाजू मांडली तर कोर्ट मोहरर जमादार राहुल मार्कंडे यांनी कामकाज पाहिले.