Life imprisonment till death to two in case of rape of minor girl verdict of District Additional Sessions Judge

पीडिता ही संध्याकाळी क्लास संपवून घरी तिच्या गाडीने जात होती. दरम्यान, दोन्ही आरोपींनी तिच्या गाडीसमोर येवून थांबवून तिला त्याच्यासोबत चालण्यास सांगितले. नाहीतर तुझी खोटी बदनामी करील अशी धमकी दिली. पीडितेला आरोपीने पवनार रोडने रेल्वेगेटच्या पलीकडे जंगलात नेले. आळीपाळीने दोघांनीही बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी पीडितेला सदर घटना कोणास सांगितल्यास तुझी बदनामी करण्याची धमकी दिली.

  वर्धा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape of a minor girl) करणा-या दोन नराधमास ५० हजार रुपये दंड व मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल वर्धा ( Wardha ) येथील जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश  मो. ई. आरलॅंड  यांनी दिला. आरोपींची नावे पवन रमेशराव डहाके व आदित्य अवधुतराव तामगाडगे दोन्ही (रा. वार्ड क्र.२), नांदोरा रोड, जुनी वस्ती, सेवाग्राम (Sevagram), (जि. वर्धा) अशी आहेत.

  आरोपींना कमल ३७६ (डी) भा.दं.वि. कायद्यानुसार २० वर्षे ते जन्मठेप व प्रत्येकी दंड रू ५० हजार रुपये व दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा, कलम ५ (जी) बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (Prevention of Child Sexual Abuse) कायद्यानुसार २० वर्षे ते जन्मठेप- मरेपर्यंत जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची (Rigorous imprisonment) शिक्षा, कलम ३४१ भा.दं.वि. अंतर्गत एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड, कलम ३२३ भा.दं.वि. अंतर्गत एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. न्यायालयाने पीडितेस नुकसानभरपाई म्हणून ७५ हजार रुपये – देण्याचे तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ नियम ७ नुसार महाराष्ट्र शासनास तीन लाख रुपये पीडितेस  नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशित करण्यात आले.

  घटनेची थोडक्यात घडले असे की, २५ सप्टेंबर २०१४ रोजी पीडित ही संध्याकाळी क्लास संपवून घराकडे तिचे गाडीने जात होती. दरम्यान, दोन्ही आरोपींनी तिच्या गाडीसमोर येवून थांबवून तिला त्याच्यासोबत चालण्यास सांगितले. नाहीतर तुझी खोटी बदनामी करील अशी धमकी दिली. पीडितेला आरोपीने पवनार रोडने रेल्वेगेटच्या पलीकडे जंगलात नेले. आळीपाळीने पीडितेसोबत दोघांनीही बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी पीडितेला सदर घटना कोणास सांगितल्यास तुझी बदनामी करण्याची धमकी दिली.

  पीडिता ही घटनेच्या दिवशी घाबरलेली असल्यामुळे तिने घडलेली प्रकार कुणलास सांगितली नाही. दुसऱ्या दिवशी तिने संध्याकाळी झालेल्या प्रकाराबाबत आई-वडीलांना सांगितले. सदरच्या प्रसंगाची तक्रार पीडितेने आई – वडिलासोबत पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे दिला. सेवाग्राम पोलिसांनी सदरचा गुन्हा नोंद केला.

  १२ साक्षीदार तपासले

  या प्रकरणाचा तपास सेवाग्राम पोलीस ठाण्यातील पराग बी. पोटे, तपासी अधिकारी यांनी केला. आरोपीतांनी गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील गिरीष व्ही. तकवाले यांनी कामकाज पाहिले व यशस्वी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक दिगाबर गांजरे यांनी साक्षदारांना न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली. शासनातर्फे एकूण १२ साक्षीदार(12 witnesses) तपासले. पीडिता, इतर साक्षदार डॉक्टर तसेच रासायनिक विशलेषक अहवाल व सरकारी वकील यांचा यशस्वी युक्तीवाद ग्राहय धरून जिल्हा न्यायाधीश – १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश मो. ई. आरलॅंड यांनी आरोपीस ३० जुलैला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.