राज्याप्रमाणे केंद्र सरकारचाही मंत्रिमंडळ विस्तार रखडला? शिंदे गटाच्या खासदारांची धाकधूक वाढली; खासदार म्हणाले…

या तीन मंत्रिपदात एक कॅबिनट व दोन राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर म्हणजे रखडल्यामुळं शिंदे गटातील खासदारांचे टेन्शन वाढले असून, राज्यातील आमदारांप्रमाणे खासदार देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे.

  मुंबई- शिवसेनेतून (shivsena) शिंदे गटाने (Shinde Group) बंड करत राज्यात भाजपासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आहे. त्यानतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेतून ३९ आमदार आणि त्यानंतर १२ खासदार बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली असून, आमदार, खासदारांसह नगरसेवक, पदाधिकारी (MLAs, MPs, corporators and officers) यांनी देखील शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळात शिंदे गटातील ९ आमदारांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. त्यानंतर आता केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, यात शिंदे गटातील तीन खासदारांना संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. या तीन मंत्रिपदात एक कॅबिनट व दोन राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  राज्याप्रमाणे केंद्राचाही मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर…?

  एकिकडे राज्यातील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे, जानेवारीच्या अखेरीस दुसरा मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त मिळणार असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यामुळं शिंदे गटातील खासदारांची धाकधूक वाढली आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील तीन खासदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. या तीन मंत्रिपदात एक कॅबिनट व दोन राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर म्हणजे रखडल्यामुळं शिंदे गटातील खासदारांचे टेन्शन वाढले असून, राज्यातील आमदारांप्रमाणे खासदार देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे.

  यांची वर्णी लागणार…?

  दरम्यान, केंद्रात शिंदे गटाला तीन मंत्रिपद मिळण्याची माहिती सुत्रांनी दिला आहे. यात १ कॅबिनेट मंत्रिपद तर २ राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मंत्रिपदामध्ये खासदार मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर मुंबईचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील श्रीरंग बारणे (Shreerang Barane) आणि विदर्भाचे प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

  शिंदे गटात आमदारांची नाराजी?

  राज्य मंत्रिमंडळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार तब्बल 39 दिवसानंतर झाला. म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी भाजपातील व शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदारांना मंत्रिपदं देण्यात आली. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार महिने उलटल्यानंतरही दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये दिवसागणिक नाराजी वाढत आहे. परिणामी हे नाराज आमदार मंत्रीपद न मिळाल्यामुळं शिंदे गटातून फुटणार का? या आमदारांमध्ये खदखद व नाराजी असल्यानं शिंदे गटात विस्फोट होणार का? अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

   खदखद वाढतेय…

  आम्ही कुणीही मंत्रिपदासाठी इच्छुक नाही. पण मंत्रिमंडळ विस्तारासाठी इतका वेळ चांगला नाही. सहा महिने निघून गेले आहेत, आम्ही फडणवीस आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की लवकर मंत्रिपदाचा विस्तार करावा, असं संजय गायकवाड म्हणाले. तर जनतेमधील संभ्रम दूर करायला हवा. फूल काढायचे, खिशात ठेवायचे, पुन्हा काढायचे असे करू नका. काही तांत्रिक बाबी असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगून टाकावे. अमूक एक तांत्रिक अडचणीमुळे विस्तार होऊ शकत नाही. सगळ्या ५०-६० आमदारांपैकी काहीही होणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले. तर दुसरीकडे आमदार संजय शिरसाट यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तार आता झाला पाहिजे असं शिरसाट म्हणालेत. मात्र मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं सत्ताधारी आमदारांमध्ये नाराज वाढत चालल्यानं यांच्यात स्फोट होईल, असं बोललं जात आहे.

  काय म्हणाले मंत्री?

  दरम्यान, तर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना विस्ताराबाबत विचारले असता, काही संतुष्ट लोक धुसफूशीबद्दल बोलत असतात. मात्र आमच्यात कुणीही नाराज नाही. मंत्रिमंडळ विस्तार पण लवकरच होईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. आम्हाला शिंदे गट म्हणून नका. आम्ही वेगळा शिंदे गट स्थापन केलेला नाही. बाळासाहेबांची शिवसेना हा आमचा पक्ष आहे, असंही सामंत म्हणाले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना वाटेल त्यावेळेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.

   गुडघ्याला बांशिंग?

  मंत्रिपदासाठी अनेकजणांनी गुडघ्याला बांशिंग बांधून बसले आहेत, अशी टिका विरोधकांनी केली आहे. मंत्रिपदासाठी शिंदे गटातील व भाजपातील अनेकजण इच्छुक आहेत. दरम्यान, दुसरा मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या आधी होईल, असं बोललं जात होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीनंतर व अमित शहांच्या बैठकीनंतर जानेवारी महिन्याच्या अखेरीस विस्तावराचा मुहूर्त मिळल्याची चर्चा आहे. दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेला आहे, परिणामी शिंदे बंडाळी गटातील नाराज आमदारांची अस्वस्थता वाढली आहे. अस्वस्थता दूर करण्यासाठी काही आमदारांना विविध महामंडळावर वर्णी लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सुरु आहे.