Lina Subhash Shegokar of Vanchit Bahujan Aghadi won Akola Zilla Parishad

शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेतील हातरुण सर्कल गटालाला वंचित बहुजन आघाडीने सुरुंग लावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत लढूनही शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. शिवसेनेच्या सदस्या सुनिता गोरे यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केल्यामुळे या सर्कलसाठी पोटनिवडणूक झाली होती. आज जाहीर झालेल्या निकालात वंचित बहुजन आघाडीच्या लीना सुभाष शेगोकार विजयी झाल्या आहेत(Lina Subhash Shegokar of Vanchit Bahujan Aghadi won Akola Zilla Parishad ).

    अकोला : शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेतील हातरुण सर्कल गटालाला वंचित बहुजन आघाडीने सुरुंग लावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत लढूनही शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. शिवसेनेच्या सदस्या सुनिता गोरे यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केल्यामुळे या सर्कलसाठी पोटनिवडणूक झाली होती. आज जाहीर झालेल्या निकालात वंचित बहुजन आघाडीच्या लीना सुभाष शेगोकार विजयी झाल्या आहेत(Lina Subhash Shegokar of Vanchit Bahujan Aghadi won Akola Zilla Parishad ).

    अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण सर्कलसाठी ५५.७६ टक्के मतदान झाले होते. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आज मतमोजणी करण्यात आली. बाळापूर येथील तहसील कार्यालयात ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

    या पोटनिवडणुकीत शिवसेना, भाजप आणि वंचितच्या उमेदवारांमध्येच थेट लढत पाहायला मिळाली, तर एक अपक्षही उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या मैदानात होता. या निवडणुकीत आता वंचितच्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला.

    हातरुण सर्कलमध्ये शिवसेनेच्या सुनिता गोरे या निवडून आल्या होत्या. मात्र त्यांना अपात्र घोषित केल्याने येथे पोटनिवडणूक पार पडली. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले होते, तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली. दरम्यान शिवसेनेचा गड असलेल्या हातरुण जिल्हा परिषद गटावर वंचितने विजय मिळवला.