दारूची राजरोसपणे ढाबे, हॉटेलवर विक्री सुरू, उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष?

श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात देशी-विदेशी, हातभट्टी दारूची दारूची राजरोसपणे ढाबे, हॉटेलवर (Hotel) विक्री सुरू असून श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस याकडे नाममात्र कार्यवाही करत आहेत परंतु ज्या ज्यांच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी आहे असे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आर्थिक मिली भगत करत असल्याचे दिसून येत आहे. ते त्यांची जबाबदारी झटकत असल्याने तालुक्यात त्यामुळे तालुक्यात अवैध धंदे चालकांना पाठबळ मिळत आहे.

    श्रीगोंदा : श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात देशी-विदेशी, हातभट्टी दारूची दारूची राजरोसपणे ढाबे, हॉटेलवर (Hotel) विक्री सुरू असून श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस याकडे नाममात्र कार्यवाही करत आहेत परंतु ज्या ज्यांच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी आहे असे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आर्थिक मिली भगत करत असल्याचे दिसून येत आहे. ते त्यांची जबाबदारी झटकत असल्याने तालुक्यात त्यामुळे तालुक्यात अवैध धंदे चालकांना पाठबळ मिळत आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे कि, श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत हातभट्टी, देशी- विदेशी दारूची विक्री श्रीगोंदा तालुक्यात राजरोसपणे सुरू असून प्रत्येक खेडे गावातही ढाबा संस्कृती वाढत चालल्याने अनेक तरुण मुलेही व्यासाच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबात कौटुंबिक कलह होत आहे तसेच कुटुंब उद्वस्त होताना दिसत आहेत. तर या खुलेआम व राजरोसपणे करत असलेल्या अवैध व्यावसायिकांना ज्यांच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी आहेत ते उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे मात्र श्रीगोंदा तालुक्यात महिन्यातून एक ते दोन वेळाच येतात.

    सर्व अवैध व्यवसायिकांना भेटून त्यांचे हित साधून परत जातात जे त्यांना भेटत नाहीत त्यांच्यावर नाममात्र कारवाई करतात. यामुळे श्रीगोंदा तालुक्यात अवैध हातभट्टी, देशी विदेशी दारू विक्री व ढाबा संस्कृती वाढत चालल्याचे दिसत आहे. तर या व्यवसायिकांवर श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी नाममात्र कार्यवाही करत आहेत. परंतु उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी नक्की काय काम करतात व त्यांची जबाबदारी काय आहे. त्यांचे नक्की काम काय आहे तसेच हा विभाग कश्यासाठी आहे हा प्रश्न सर्व सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.

    श्रीगोंदा बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांनी सांगितले, हातभट्टी देशी-विदेशी दारू, ढाबे यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार कायदेशीर आम्हाला नाहीत. यासाठी उत्पादन शुल्क हा विभाग विशेष विभाग आहे परंतु ते काहीच कार्यवाही करत नसल्याने आम्हाला तक्रारी आल्यानंतर नाईलाजाने तात्पुरती कार्यवाही कार्यवाही करावी लागत आहे, असे बेलवंडी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांनी सांगितले.