ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर; संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे तर सांगलीतून चंद्रहार पाटील ‘फिक्स’

लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. त्यानुसार, विविध पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा केली जात आहे. त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

  मुंबई : लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. त्यानुसार, विविध पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा केली जात आहे. त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 17 नावे असून, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे तर सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काही विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. यातील विशेष बाब म्हणजे जे लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले नाहीत त्या निष्ठावंतांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

  दरम्यान, सध्या 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. असे जरी असले तरी ठाकरे गट एकूण 22 जागांवर निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

  कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

  – छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  – धाराशिव – ओमराजे निंबाळकर

  – बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
  – यवतमाळ – संजय देशमुख

  – मावळ – संजोग वाघेरे-पाटील
  – सांगली – चंद्रहार पाटील

  – हिंगोली – नागेश अष्टीकर
  – शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे

  – नाशिक – राजाभाऊ वाझे
  – रायगड – अनंत गिते

  – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – विनायक राऊत
  – ठाणे – राजन विचारे

  – मुंबई-ईशान्य – संजय दीना पाटील
  – मुंबई – दक्षिण – अरविंद सावंत

  – मुंबई – वायव्य – अमोल कीर्तिकर
  – मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
  – परभणी – संजय जाधव