little child injured in stray dog attack in kalyan citizens anger demanding concrete action nrvb

कल्याण पश्चिमेच्या मुरबाड रोड परिसरात (Murbad Road Area) असणाऱ्या ब्राह्मण सोसायटीत बुधवारी हा प्रकार घडला. या सोसायटीत राहणारा आणि तिसऱ्या इयत्तेत शिकणारा आर्यन अविनाश गुरव हा परवा सोसायटीच्या आवारात खेळत होता. त्यावेळी सोसायटीत असणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्यापैकी एका कुत्र्याने त्याच्या पायाला चावा घेतल्याची माहिती सोसायटीतील रहिवाशांनी दिली.

    कल्याण : भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये (Stray Dog Attacks) एक लहान मुलगा जखमी (Little Child Injured) झाल्याची घटना कल्याण पश्चिमेत (Kalyan West) घडली आहे. तर परिसरातील भटक्या कुत्र्यांबाबत केडीएमसी प्रशासनाने (KDMC Administration) ठोस कार्यवाही करण्याची मागणी करत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

    कल्याण पश्चिमेच्या मुरबाड रोड परिसरात (Murbad Road Area) असणाऱ्या ब्राह्मण सोसायटीत बुधवारी हा प्रकार घडला. या सोसायटीत राहणारा आणि तिसऱ्या इयत्तेत शिकणारा आर्यन अविनाश गुरव (Aryan Avinash Guruv) हा परवा सोसायटीच्या आवारात खेळत होता. त्यावेळी सोसायटीत असणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्यापैकी एका कुत्र्याने त्याच्या पायाला चावा घेतल्याची माहिती सोसायटीतील रहिवाशांनी दिली. तर या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच काल संध्याकाळीही आणखी एका व्यक्तीला कुत्रा चावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    दरम्यान सोसायटी परिसरात वाढलेल्या या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबद्दल येत्या रविवारी रहिवाशांची एक बैठक बोलवण्यात आली आहे. ज्यामध्ये या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचेही यावेळी एलएनएनला सांगण्यात आले. तसेच केडीएमसी प्रशासनानेही या समस्येबाबत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.