मोठी बातमी | Live Update : ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं आंदोलन... | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट11 महीने पहले

Live Update : ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं आंदोलन…

ऑटो अपडेट
द्वारा- Dnyaneshwar More
कंटेन्ट रायटर
13:31 PMJun 26, 2021

'ओबीसीचे आरक्षण घालवले हे राजकीय षडयंत्र आहे. राज्याचे नेते काही झाले तर नरेंद्र मोदींकडे बोट दाखवतात. उद्या यांच्या बायकोनी मारले तरी तेव्हा देखील हे मोदी यांच्याकडेच बोट दाखवतील', असा सणसणीत टोलाही लगावला. 'या आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेस आहे. काँग्रेस नेते या साठी आरक्षणात कोर्टात गेले होते. त्यामुळे आरक्षण गेले. आमच्या हाती सूत्र द्या मी ओबीसींचे आरक्षण परत आणून दाखवले नाही तर राजकीय संन्यास घेईल', असंही फडणवीस म्हणाले.

13:30 PMJun 26, 2021

OBC आरक्षण मिळवून नाही दिलं तर राजकीय सन्यास घेईल, फडणवीसांचं मोठं विधान

11:56 AMJun 26, 2021

'सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आंदोलन रद्द होणे हे ठाकरे सरकारचे पाप आहे', असं आशिष शेलार म्हणाले आहेत. आंदोलनादरम्यान बोलताना आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 'ओबीसींना मिळालेलं राजकीय आरक्षण फक्त महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे. कोर्टाला हवा असलेला इंपेरिकल डाटा त्यांनी दिला नाही. आयोगाची निर्मिती केली नाही. त्यामुळे आरक्षण गेलं. हे राजकीय आरक्षण परत मिळवणं ही भाजपाची घोषणा आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही थरापर्यंत जाऊ आणि आरक्षण मिळवून देऊ', असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

11:21 AMJun 26, 2021

राज्यसरकारने ओबीसी च्या मुद्यावर तात्काळ निर्णय घेतला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार : खा प्रीतम मुंडे

11:00 AMJun 26, 2021

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी 10 वाजता पुण्यातील कात्रज चौकात या आंदोलनाला सुरुवात झाली. दरम्यान, आंदोलनाला राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, ओबीसी आघाडी प्रदेश अध्यक्ष योगश टिळेकर, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच पक्षाचे इतर आमदार आणि नगर सेवक उपस्थित असणार आहेत.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून 26 जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. तर भाजपच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर आता काँग्रेसनंही 26 जून रोजी आंदोलनाची घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केलंय.

Advertisement
Advertisement

Leave Kashmir Or Be Ready to Die काश्मीर सोडा नाहीतर मरायला तयार राहा; लष्कर-ए-इस्लामची काश्मिरी पंडितांना धमकी

Advertisement
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.