बापरे! जिवंत पत्नीचे केले पिंडदान, पत्नीला कंटाळलेल्या ५० पतींनी ‘या’ शहरात केले पूजन

सध्या पितृपक्ष आणि श्राद्ध महिना सुरू आहे, जिथे लोक त्यांच्या मृत नातेवाईकांना पिंड दान देतात. त्याचेच औचित्य साधून या ५० पतींनी आपापल्या जिवंत पत्नीचे पिंडदान केले.

    मुंबई : पितृ पक्षानिमित्त (Pitaru paksh) मुंबईतील बाणगंगा तलावाच्या काठावर अनेकांनी आपल्या जिवंत पत्नींचे (Wife) पिंडदान (Pinddaan) केले. हे सर्व पती (Husbands) पत्नीपीडित असून, त्यांचा एकतर घटस्फोट (Divorce) झाला आहे किंवा प्रकरण न्यायालयात (Court) प्रलंबित आहे. सध्या पितृपक्ष आणि श्राद्ध महिना सुरू आहे, जिथे लोक त्यांच्या मृत नातेवाईकांना पिंड दान देतात. त्याचेच औचित्य साधून या ५० पतींनी आपापल्या जिवंत पत्नीचे पिंडदान केले.

    दरम्यान, लग्नाच्या वाईट आठवणींपासून मुक्त होण्यासाठी आपल्या जिवंत पत्नींचे पूर्ण विधीने पिंडदान केले. यातील एकाने मुंडनही केले, नंतर बाकीच्यांनी केवळ पूजेत भाग घेतला. वास्तव फाऊंडेशन या पत्नी पिडीत नवऱ्यांच्या संस्थेच्या वतीने मुंबईत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्नीच्या छळाला कंटाळून या लोकांनी पिंडदान केले असून यापैकी बहुतेक असे लोक आहेत ज्यांनी एकतर घटस्फोट घेतला आहे किंवा त्यांनी आपल्या पत्नीला सोडले आहे. मात्र त्याच्या वाईट आठवणी आजही सतावत आहेत.

    वाईट आठवणी दूर करण्यासाठी पिंडदान

    पिंडदान करणारे पती मानतात की स्त्रिया त्यांच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत त्यांचे शोषण करत हाेत्या, परंतु पुरुषांसमोर त्यांचे ऐकले जात नाही. त्यांचे पत्नींसोबतचे नाते संपुष्टात आले आहे, म्हणून पितृ पक्षाच्या निमित्ताने हे पिंडदान केले गेले आहे, जेणेकरून त्याची वाईट आठवणीतून सुटका होईल. वास्तव फाऊंडेशन दरवर्षी वेगवेगळ्या शहरात अशा कार्यक्रमाचे आयोजन करते.