Local police arrested four persons for selling counterfeit notes

सदरच्या बनावट नोटांचे निरीक्षण केले असता नोटांचा रंग काही ठिकाणी फिक्कट तर काही ठिकाणी अति गडद असून नोटांचा कागद हा खन्या नोटांच्या तुलनेत अत्यंत साधा असून नोटेवर फोटेचा सिक्युरीटी मार्क नसल्याचे आढळून आले आहे. तसेच सदरच्या बनावट नोटांचा अत्यंत गंभीर संवेदनशील व देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत गुन्हा उडकीस आणून स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी पार पडली आहे.

    यवतमाळ : बनावट भारतीय चलन बाळगून जुन्या नोटांच्या मोबदल्यात २०० रुपये रकमेच्या दुप्पट नोटा विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून ९६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १० मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढरकवडा रोडवर केली आहे.

    सैयद वसीम सैयद जमील (२३) (रा. बिलाल नगर, कोहीनूर सोसायटी, यवतमाळ), वसीम शहा उर्फ मुन्ना अहेमद शहा (२७) (रा. पाटील ले आबुट, यवतमाळ), दानीश शहा तथब शहा (१९) वर्ष (रा. सुंदर नगर) भोसा रोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार १० मे २०२२ रोजी पोलीस अधीक्षक यांना गोपनिय माहिती मिळाली की, यवतमाळ शहरात काही इसम हे जुन्या नोटांचे मोबदल्यात २०० रु रकमेच्या दुप्पट नोटा विक्री करीत असून सदर इसम हे १० मे रोजी पांढरकवडा रोड परिसरात बनावट नोटा विक्री करण्याकरीता येणार आहेत.

    या माहितीवरून पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ यांनी सदर इसमांवर कायदेशीर कारवाई करीता आदेश पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा (यवतमाळ) यांना दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी पेट्रोलींग मध्ये असलेल्या पथकासह गोपनिय माहीतीच्या आधारे पांढरकवडा रोड परिसरात सापळा रचला. तेव्हा ३ इसम हे संशयास्पद हालचाली करतांना आढळले. त्यानंतर पोलिसांनी संबधीतांना चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली. तेव्हा तिघांजवळ ८९ नग २०० रूपये किंमतीच्या बनावट नोटा मिळाल्या.

    सदर इसमांची अधिक विचारपूस केली असता, त्यांना सदरच्या नोटा या शाकीब हमीद अकबानी वय २१ वर्ष (रा. मेमन कॉलनी ) यवतमाळ असे सांगितल्याने शाकीब हमीद अकबानी यास ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये १९ नग २०० रूपये किमतीच्या बनावट नोटा मिळून आल्याने जप्त करण्यात आल्या आहे. सदर चार आरोपीकडून आतापर्यंत एकूण १०८ नग २०० रुपये किंमतीच्या बनावट नोटा, दोन मोटर सायकल ६० हजार, चार मोबाईल ३६ हजार असा एकूण ९६ हजाराचा मुझेमाल जप्त करण्यात आला आहे.  याप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात भांदवी ४८९ (ब) (क), १२० (ब), ३४ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप परदेशी हे करीत आहेत.

    सदरच्या बनावट नोटांचे निरीक्षण केले असता नोटांचा रंग काही ठिकाणी फिक्कट तर काही ठिकाणी अति गडद असून नोटांचा कागद हा खन्या नोटांच्या तुलनेत अत्यंत साधा असून नोटेवर फोटेही सिक्युरीटी मार्क नसल्याचे आढळून आले आहे. तसेच सदरच्या बनावट नोटांचा अत्यंत गंभीर संवेदनशील व देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत गुन्हा उडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी पार पाडल्याबद्दल डॉ. दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला २५ हजार रुपये सि.नोट, GST प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले आहे.