शेतकरी आंदोलनासाठी पाकिस्तानातून रसद  -उपमहापौरचे केशव घोळवे वादग्रस्त वक्तव्य

शेतकरी आंदोलनाला पाकिस्तानातून रसद पुरवली जात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी केली आहे.

 

पिंपरी: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाकिस्तानातून रसद पुरवली जात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी केली आहे. महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे वक्तव्य केले आहे. मागील ११ दिवसांपासून केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.  अनेक कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे  शेतकऱ्यांनी दिलेले भारत बंदच्या हाकेलाही देशभरातून पाठिंबा दिला जात आहे.  महाराष्ट्रातूनही अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.