लोकविकास प्रतिष्ठान कडून सामान्यांची दिवाळी गोड ; ना नफा ना तोटा तत्वावर फराळ वाटप

लोकविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ना नफा न तोटा या तत्त्वावर शहरातील सर्वसामान्य लोकांना दिवाळीचा फराळ उपलब्ध करून दिला आहे. सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी, हा या पाठीमागचा उद्देश असून या उपक्रमाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जय पाटील यांनी केले आहे.

    बारामती:  लोकविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ना नफा न तोटा या तत्त्वावर शहरातील सर्वसामान्य लोकांना दिवाळीचा फराळ उपलब्ध करून दिला आहे. सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी, हा या पाठीमागचा उद्देश असून या उपक्रमाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा लोकविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जय पाटील यांनी केले आहे.

    बारामती शहरातील आबासाहेब सातव चौक तांदूळवाडी रोड येथे जय पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस आजिनाथ चौधर, जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे,पत्रकार प्रशांत ननावरे, प्रमोद ठोंबरे, युवक अध्यक्ष अविनाश बांदल, उद्योजक सतीश कोकरे, तसेच दिगंबर पाटील साधू बल्लाळ आनंद जाधव मदन मलगुंडे अतुल कांबळे, अजित पाटील, आशिष तावरे, राहुल मदने रमेश चांदगुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महागाईचे संकट दिवाळीच्या सणावर असून वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न लोकविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला आहे. बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीत दिवाळीचा फराळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेकडून देखील या उपक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मोतीचूर लाडू, बेसन लाडू ,रव्याचे लाडू, शंकरपाळी,शेव, चकली शेव, करंजी, गुलाबजाम, डिंक लाडू ,म्हैसूर पाक, बालुशाही, बाकरवडी, काजुकतली तसेच सर्व प्रकारचे चिवडे उपलब्ध आहेत. शहरातील सातव चौकात प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

    शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कमी किमतीत दिवाळीचा फराळ उपलब्ध व्हावा, या उद्देशाने उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाचे प्रथम वर्ष असून सर्वसामान्यांचा प्रतिसाद मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आगामी काळात शहरभर अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याचा मानस आहे.

    -जय पाटील,शहराध्यक्ष ,बारामती राष्ट्रवादी काँग्रेस.