राज ठाकरे अन् नरेंद्र मोदी यांची तोफ एकत्र धडाडणार; मुंबईमध्ये घेणार एकत्र सभा

बईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची एकत्रित सभा पार पडणार आहे.        

    पुणे – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीसह महायुतीने जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र दौरे देखील वाढले असून त्यांच्या अनेक सभा राज्यामध्ये होत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे तसेच ते प्रचारामध्ये देखील सहभागी होणार आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची एकत्रित सभा पार पडणार आहे.

    आज पुण्यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रचारासाठी आढावा बैठक घेतली. यावेळी प्रचार करण्यासंदर्भात आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेनेच्यावतीने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे जे मनसे पदाधिकारी पक्षाचे काम करणार नाहीत त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उचलणार जाणार आहे असे आदेश देखील मनसेकडून देण्यात आले आहे.

    अमित ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मुंबईमधील सभेचे संकेत देखील दिले आहे. नरेंद्र मोदी यांची मुंबईमध्ये सभा होणार आहे. यावेळी राज ठाकरे देखील असणार आहेत. नरेंद्र मोदी व राज ठाकरे एकाच मंचावरुन भाषण देणार असल्याने सर्वांना या सभेची उत्सुकता लागली आहे. शिवाजी पार्कवर ही सभा पार पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर मनसेमधून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे उभे राहिले आहे. अमित ठाकरे यांनी वसंत मोरे हे सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचा टोला लगावला आहे.